PM KISAN : या योजनेद्वारे लाभार्थ्यांना कमी दरात मिळणार कर्ज, अशाप्रकारे करा अर्ज - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

PM KISAN : या योजनेद्वारे लाभार्थ्यांना कमी दरात मिळणार कर्ज, अशाप्रकारे करा अर्ज

2
5/5 - (1 vote)

PM KISAN YOJANA :अगदी कमी व्याजदरांमध्ये सरकार शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देत आहे.अल्पभूधारक शेतकरी व शेती या व्यवसायावर अवलंबून असणारी इतर शेतमजूर यांच्या हितासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. पीएम किसान सन्मान योजना(pm kisan sanman yojana)आणि किसान क्रेडिट कार्ड योजना(kisan credit card yojana) या दोन योजना आत्मनिर्भर भारत (atamnirbhar bharat)योजनेअंतर्गत लिंक करण्यात आलेले आहे.

म्हणजे या योजनांचे एकत्रीकरण करण्यात आलेली आहे. या योजना शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. जे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे, ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे , ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील. शेतकऱ्याकडे असणाऱ्या किसान क्रेडिट कार्डवर कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. (Kisan credit card loan)

किती मिळणार कर्ज? How Much Loan Will Granted?

हे कर्ज किसान क्रेडिट कार्ड द्वारे दिले जाणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. कर्जाचा व्याजदर अत्यंत अल्प म्हणजेच केवळ चार पर्सेंट व्याजदराने कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे हे कर्ज शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरामध्ये आहे. तसा या कर्जाचा व्याजदर हा 11% आहे. परंतु 11 % मधील ही 4% सबसिडी सरकार देणार आहे . आणि वेळेवर परतफेड केल्यास त्यामधील 3% ही व्याजदर शेतकऱ्यांना माफ केला जाईल .त्यामुळे या कर्जाचा व्याजदर फक्त 4 % पडणार आहे. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे कर्ज देण्यास जर विलंब झाला तर 7% ही कर्ज व्याजदर शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे.

KCC : किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे?

क्रेडिट कार्ड कर्जाचा अर्ज आपल्या स्वाक्षरीसह , आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, आदी. अर्जदाराचा राहण्याचा पत्ता, सातबारा उतारा किंवा शेत जमीन कसण्यासाठी घेतली असल्यास त्याचे प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट साईज फोटो, कर्जासाठी तुम्ही थेट बँकेत जाऊ शकता. बँकेतील अधिकाऱ्यांकडून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ते कागदपत्र सांगतील. ती कागदपत्रे आपण जमा करु दिल्यास बँक आपल्याला कर्जाची पुर्तता करेल. स्टेट बँकेतून जर तुम्ही कार्ड घेत असाल तर तुम्ही ऑनलाईनही यासाठी अर्ज करु शकता. https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर गेल्यास आपल्याला अर्ज मिळेल.

SBI देते किसान क्रेडिट कार्ड, ऑफलाइन-ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या. SBI किसान क्रेडिट कार्ड ऑफलाइन ऑनलाइन चेक प्रक्रिया कशी लागू करावी हे जाणून घ्या .
जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

KCC: किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेती व्यवसाय सोबतच या व्यवसायांसाठी देखील मिळेल आता कर्ज ! महाराष्ट्र ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेमध्ये अव्वल ! बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

This image has an empty alt attribute; its file name is image-2-1.gif

tags:

pm kisan yojana, kisan credit card, kisan credit card loan scheme, KCC, kisan credit card vr kiti milanar karj, loan on cradit card, pm kisan sanman nidhi yojana, maharashtra yojana, new update yojana, KCC loan scheme 2022, kisan credit card kase kadhave marathi, pm sanman nidhi yojana loan scheme in marathi,

Share via
Copy link