पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अर्थातच किसान या योजनेची आठवी यादी एप्रिल महिन्यामध्ये जाहीर होणार आहे तर ती यादी कशी पहावी यासाठी क्लिक करा..
pmkisan samnan nidhi yojana list 2021,pm kisan new update,new list of pm kisan yojana,6000 rupaye shetkari mandhsn yojana,pm किसान सम्मान निधी योजना नवीन यादी,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची नवीन यादी 2021,how to check pmkisan yojana list in maharashtra,pm kisan yojana beneficiary list,new beneficiary list of pn kisan yojana,pm kisan yojsna navin labharthi yadi,shetkari mandhan yojana list,pm kisan,beneficiary list – pm kisan
?केंद्र सरकार एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम १० एप्रिलाच्या सुमारास पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे.
?पीएम-किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत सात हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. आठव्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवले जाणार आहेत.
11.66 कोटी शेतकऱ्यांना फायदा
?केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.66 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. शेतकऱ्यांना या योजनेनुसार 1.15 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत.
?आठव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या रेकॉर्डमध्ये काही दुरुस्ती असेल तर करुन घ्यावी लागणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जातात. पहिला हप्ता डिसेंबर ते मार्च, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै आणि तिसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान जारी केला जातो. पीएम किसान सन्मान योजनेसाठी देशातील 11.66 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांच्या रेकॉर्डमध्ये अडचणी असल्यामुळे त्यांना मदत मिळत नाही. जर सर्व शेतकऱ्यांचं रेकॉर्ड दुरुस्त केले तर सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळू शकतात.
हेही वाचा : मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी जाणून घ्या अफलातून गोष्टी
आपल्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासणार?
1) पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे आले का हे तुम्ही सहजपणे तपासू शकता
2) तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
3) सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
4) तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
5) होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
6) तिथे स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा
7) त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
8) त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल.
संदर्भ – TV9 Marathi,
यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.