PM kisan yojana : करोडो शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! आता प्रतीक्षा संपली ...लवकरच खात्यात इतके होणार - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

PM kisan yojana : करोडो शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! आता प्रतीक्षा संपली …लवकरच खात्यात इतके होणार

1
Rate this post

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून 11 कोटीहून अधिक शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या निधीच्या प्रतीक्षेत आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी केव्हा येईल? याचा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांना पडला आहे. तर ,आता शेतकऱ्यांच्या प्रतिक्षेचे फळ म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी करोडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याचा तो दिवस ठरला आहे. तर ,तो दिवस म्हणजे शनिवार म्हणजेच नूतन वर्षामधील पहिलाच दिवस तर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा हप्ता लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

यापूर्वी 25 डिसेंबरला पी एम किसान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी घोषणा करण्यात आली होती . परंतु काही तांत्रिक कारणास्तव पी एम किसान योजनेच्या निधी वाटप चा हा प्रस्ताव नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ठरवण्यात आला एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जवा होणार आहे. त्यानुसार सर्व नियोजन पूर्ण झालेले आहे.

राज्यातील फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार का पी एम किसान योजनेचा लाभ ?
महाराष्ट्रातील 1 कोटी 5 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे .तर या मध्ये कोणते शेतकरी समाविष्ट आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोच केंद्र सरकारच्या वतीने ही योजना राबवली जात असून देशभरातील 11 कोटी हुन अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. त्या अनुषंगाने दोन हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असल्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी सांगितले आहे. ओमीक्रनच्या वाढत्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी बँकांमध्ये गर्दी करू नये. तसेच करोना च्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

eKYC ही प्रक्रिया केल्यावरच निधी जमा होणार का ?

eKYC केल्यावरच मिळणार का सन्मान निधी ?असा प्रश्न सर्व शेतकर्‍यांना पडलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो घाबरून जाण्याचे काही कारण नाही केवायसी न करताही हा हप्ता मिळेल मात्र यानंतरची म्हणजेच मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळण्यासाठी eKYC मार्च 2022 पर्यंत पूर्ण केलेली असावी. यासाठी फक्त पंधरा रुपये शुल्क आकारले जाईल.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यासोबत साधणार थेट संवाद
गुजरात नंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणारा आहे . एकीकडे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणारा . गुजरातमध्ये आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी त्यांचे मार्गदर्शन पाहिले असल्याचे कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. आता गावपातळीवरील शेतकऱ्यांनाही या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होता येईल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

http://pmindiawebcast.nic.in/
वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ला जॉईन होऊ शकता. नववर्षाच्या नव दिवसावर पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्याशी काय संवाद साधणार याची उत्सुकता प्रत्येकच शेतकऱ्याला लागलेली आहे.

pm kisan 10 va hafta ya divshi milnar
Share via
Copy link