pm kisan yojana Big change in PM Kisan Yojana, now it needs a document; Otherwise
[ad_1]

Pm Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) ही शेतकऱ्यांसाठी (Farmer) चालवली जाणारी मोदी सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते.
या योजनेद्वारे दिलेली आर्थिक मदत सरकारकडून (Modi Government) शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये वर्ग केली जाते, परंतु आता या योजनेच्या नोंदणीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आता सर्व शेतकऱ्यांना नोंदणी करताना त्यांच्या शिधापत्रिकेची (Ration Card) माहितीही द्यावी लागणार आहे.
पीएम किसान योजनेत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने हा मोठा बदल केला आहे. आता तुम्हाला नोंदणी करताना रेशन कार्डअपलोड करावे लागेल, अन्यथा तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. यासोबतच सरकारने योजनेसाठी ई-केवायसी करणेही बंधनकारक केले आहे.
योजनेत केलेले मोठे बदल
पीएम किसान योजनेअंतर्गत, तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची पीडीएफ प्रत पोर्टलवर अपलोड करावी लागेल. यासोबतच आधार कार्ड, खतौनी, बँक पासबुक आदींच्या हार्ड कॉपी जमा करण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. यानंतर तुम्हाला फक्त रोशन कार्ड अपलोड आणि ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.
ई-केवायसी आवश्यक आहे
सरकारने शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी 31 जुलै 2022 पर्यंत वेळ दिला आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचाही लाभ मिळालेला नाही. अशा प्रकारे, जर तुम्ही केवायसी केले नसेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करा.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, ही योजना केंद्राची एक महत्वाकांक्षी योजना आहे. मात्र या योजनेत मध्यंतरी अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ उचलला असल्याने केंद्र सरकारने या योजनेत आता मोठा अमुलाग्र बदल केला असून आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी रेशन कार्ड सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेच्या पात्र शेतकरी बांधवांना ई-केवायसी करणे देखील आता महत्त्वाचे झाले आहे.
[ad_2]
आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठीआम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.