आले रे... पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग, असे करा चेक…! - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

आले रे… पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग, असे करा चेक…!

0
5/5 - (3 votes)

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील 11 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती.. मात्र, आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून, मोदी सरकारने अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2000 रुपये वर्ग केले आहेत..

मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून शिमला येथे ‘गरीब कल्याण संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 10.50 कोटी शेतकऱ्यांना शुभेच्छा देताना, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता ‘डीबीटी’द्वारे (थेट बॅंक खात्यावर) जारी केला.

21 हजार कोटी वर्ग
पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) 11व्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर 21 हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. आज (ता. 31) संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत (बुधवारी) शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर प्रत्येकी 2000 रुपये जमा होतील…

पंतप्रधान मोदी म्हणाले, की “पंतप्रधान किसान सन्मान निधीचे पैसे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाले. सिमल्याच्या भूमीतून देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याचा बहुमान मला मिळाल्याचा आनंद वाटतो..”

दरम्यान, पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असला, तरी तुमच्या खात्यावर 2000 रुपये जमा झाले की नाही, हे तपासता येणार आहे. ते खालीलप्रमाणे :

  • सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
  • उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’चा पर्यायावर क्लिक करा. नंतर ‘लाभार्थी स्थिती’वर क्लिक करा. येथे एक नवीन पृष्ठ उघडेल.
  • नवीन पृष्ठावर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांकापैकी एक पर्याय निवडा. त्यानंतर ‘डेटा मिळवा’ वर क्लिक करा.
  • तुमच्या खात्यात हप्ता कधी आला, कोणत्या बँक खात्यात जमा झाला., अशी सगळी माहिती येथे मिळेल.

आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले होते. अखेरचा दहावा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर लगेच 11 व्या हप्त्याची चर्चा सुरु झाली होती..

हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यापूर्वीच सरकारने कडक नियम केल्याने 2000 रुपये मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांच्या मनात संशय निर्माण झाला होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ केल्याशिवाय 11व्या हप्त्याचे पैसे मिळणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र, अखेर 11व्या हप्त्याचे पैसे वर्ग होण्यास सुरवात झाली आहे..

महत्वाच्या बातम्या –

Share via
Copy link