पीएम किसान योजनेमध्ये नवीन बदल ! पुढील हप्त्यासाठी हे करणे अनिवार्य ?
पंतप्रधान किसान योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल ? काय आहेत हे बदल? काय करावे लागेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी?जुन्या लाभार्थ्यास मिळेल का योजनेचा लाभ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये भेडसावत असतील तर या प्रश्नांची उत्तरे या लेखामध्ये तुम्हाला मिळणार आहेत.
पंतप्रधान किसान योजनेमध्ये होणाऱ्या घोटाळ्याला आळा घालण्यासाठी आणि गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. पुढील हप्त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना या नवीन बदलांची पूर्तता करणे अनिर्वार्य केले आहे. असे न केल्यास त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे हप्ते जमा होणार नाही . पुढील हप्तेही त्यांना मिळणार नाहीत .म्हणून काय आहेत हे नवीन बदल? हे जाणून घेणे खूप महत्वाचे झाले आहे.
नवीन नियम कोणते?
पंतप्रधान किसान योजनेमध्ये केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये आणखी एका नियमाची नोंदणी केली आहे. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे बाजी होत आहे. या घोटाळ्याला आळा घालण्यासाठी सरकारने हा नियम लागू केला आहे .हा नियम शेतकऱ्यांच्या हितार्थ आहे. मोदी सरकारने पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना राशन कार्ड अनिवार्य केले आहे. नवीन बदलांमध्ये राशन कार्ड शिवाय कोणत्याही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही .अशी तरतूद केली आहे .त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेशी संबंधित एजन्सीकडे तातडीने नियमातील बदलानुसार राशन कार्ड योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर नोंदवावे. त्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपयांचा हप्ता मिळणार नाही.
राशन कार्ड क्रमांक नोंदणी करावी :
पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो. मात्र एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेत आहेत .अशा अनेक बाबी सरकारच्या लक्षात आल्या. त्यामुळेच या सर्व गोष्टीला आळा घालण्यासाठी राशन कार्ड क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. राशन कार्ड सादर न केल्यास किसान सन्मान निधी चा पुढचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार नाही.
पी एम किसान योजनेचे वैशिष्ट्य
पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा तीन हप्ते असे एकूण सहा हजार रुपये प्रदान केले जातात .एक जानेवारीला पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील 10 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले होते त्याच बरोबर त्यांनी शेतकऱ्यांची संवादही साधला.
सध्या परिस्थिती तपासण्याच्या नियमात ही बदल.
याआधी आपल्या खात्यातील हप्ते किंवा आपल्या खात्याचे परिस्थिती तपासण्यासाठी फक्त मोबाईल नंबरची गरज पडत होती पण आता या नियमांमध्ये बदल करून मोबाईल नंबर सोबतच आधार कार्ड क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक देण्याचीही गरज पडेल .तेव्हाच तुमच्या खात्याचा तपशील तुम्ही घेऊ शकता. घोटाळेबाजांना हुडकाऊन लावण्यासाठी केलेला हा महत्त्वपूर्ण बदल आहे .याची सर्व शेतकऱ्यांनी पूर्तता करावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा.
Tags :
pm kisan, pm kisan yojana update, pm kisan sanman nidhi yojana, pm kisan 2022,new update of pm kisan, navin badal pm kisan, pm kisan sanaman nidhi yojana 2022, pm kisan new changes, scheme of maharashtra, central goverment scheme for farmer, gov scheme, modiji ki yojana, modi yojana