शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: पीकविम्याचे २४२४ कोटी वितरित, अशी पहा यादी

नवी दिल्ली। केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देत पीक विम्याचे २४२४ कोटी रूपये वितरित केले आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाने याबाबत माहिती दिली असून याबरोबरच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक उपाययोजना केल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. 

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत १२ राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना २४२४ कोटी रूपये विमा वितरित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पीएम किसान निधी योजनेतील सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड अथवा के.सी.सी चाही लाभ मिळणार आहे. सध्या देशातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे शेतकरी वर्गाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी केंद्रसरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. 

अशी पहा यादी :

Leave a Comment

X