Pomegranate Farming: काय सांगता! तेल्या रोगाला आळा घालता येणार…! फक्त 'हे' काम करावं लागनार; वाचा सविस्तर - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Pomegranate Farming: काय सांगता! तेल्या रोगाला आळा घालता येणार…! फक्त ‘हे’ काम करावं लागनार; वाचा सविस्तर

0
Rate this post

[ad_1]

Pomegranate Farming: भारतातील शेतकरी बांधवांनी (Farmer) गेल्या काही वर्षांपासून उत्पादनवाढीच्या अनुषंगाने फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) सुरू केली आहे. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी देखील डाळिंब (Pomegranate Crop) या फळबागाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

खरं पाहता डाळिंब हे एक प्रमुख फळबाग पीक असून याच्या शेतीतून शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न (Farmer Income) देखील मिळत आहे. मात्र असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून डाळिंब बागांवर रोगांचे संकट दिवसेंदिवस दाट होत आहे. डाळिंबावर तेल्या, मर रोग यांसारख्या भयंकर रोगांचा प्रादुर्भाव लक्षणीयरीत्या वाढल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे (Pomegranate Grower Farmer) मोठे नुकसान होत आहे.

डाळिंबावर तेल्या रोग जणूकाही काळ बनुनच तुटला आहे. या रोगामुळे राज्यातील अनेक डाळिंब बागायतदारांनी आपल्या डाळिंबाच्या बागा क्षतीग्रस्त केल्या असून दुसऱ्या पिकांकडे वळले आहेत. यामुळे एकेकाळी उत्पन्नाचे शास्वत साधन म्हणून पाहिल्या जाणाऱ्या डाळींबाकडे आता लोक पाठ फिरवत असल्याचे चित्र. मात्र डाळिंब पिकासाठी घातक ठरलेल्या तेल्या रोगावर देखील नियंत्रण (pest control) मिळवता येते. मात्र तेल्या रोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकरी बांधवांना काही उपाय योजना (pomegranate crop management) डाळिंब बहार पकडण्यापूर्वीच कराव्या लागतात.

तेल्या रोगासाठी आधीच केल्या पाहिजेत या उपाययोजना 

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, गणेशखिंड येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विनय सुपे यांनी एका कार्यक्रमादरम्यान डाळींब बागायतदारांसाठी मोलाचा सल्ला दिला आहे. विनय सुपे यांच्या मते, डाळिंब बागायतदारांनी डाळिंब पिकासाठी घातक ठरत असलेल्या तेल्या रोगाचे व्यवस्थापन रोग आल्यावर केल्यास काहीही फायदा होणार नाही.

मात्र जर डाळिंब बागायतदारांनी रोग येण्याच्या आधी करण्यास सुरुवात केली तर निश्चितच त्यांना फायदा होणार आहे. सुपे यांच्या मते डाळिंबाचा बहार यशस्वी करण्यासाठी बागायतदारांनी डाळिंबासाठी आवश्यक खतांची तसेच औषधांची मात्रा कृषी विद्यापीठांच्या शिफारशीने वापरली पाहिजेत.

डॉ. सुपे एका शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात म्हणाले की,  ”डाळिंब झाडांची आंतरिक शक्ती वाढवली तर डाळिंब पिकावर रोग कमी येतील. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, पानांचा आकार मोठा असला पाहिजे. झाडांची शरीरक्रिया शेतकरी बांधवांना कळली पाहिजे. शिवाय बागायतदारांनी आपल्या जमिनीचा अभ्यास असला पाहिजे. चुकीच्या गोष्टींचा वापर टाळला तरच उत्पादन खर्चात बचत होईल. ”

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link