Pomegranate Rate: अरे व्वा..! शेतकऱ्याची चांदी…! डाळिंबाला मिळाला 250 रुपये किलोचा दर - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Pomegranate Rate: अरे व्वा..! शेतकऱ्याची चांदी…! डाळिंबाला मिळाला 250 रुपये किलोचा दर

0
Rate this post

[ad_1]

Pomegranate Rate: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून उत्पादनवाढीचा अनुषंगाने डाळिंबाची शेती (Pomegranate Farming) करत आहेत. राज्यातील शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणात डाळिंब लागवड करत असतात.

राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात डाळिंबाची शेती (Farming) विशेष उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना (Pomegranate Grower Farmer) डाळिंब शेतीचा मोठा फायदा होत आहे.

सध्या पश्चिम महाराष्ट्रात डाळिंबाचा हंगाम सुरू झाला असून डाळिंबाला आता उच्चांकी दर मिळू लागला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे.

जुन्नर एपीएमसी (Junnar APMC) अंतर्गत येणाऱ्या आळेफाटा उपबाजारात तीन तारखेला झालेल्या लिलावात डाळिंबाला विक्रमी अडीचशे रुपये प्रतिकिलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनाला भिडला आहे.

तीन तारखेला लिलावासाठी आलेल्या एका 20किलोच्या डाळिंबाच्या कॅरेटला पाच हजार रुपये असा विक्रमी बाजार भाव मिळाला. याबाबत उपबाजार समितीचे सचिव रुपेश कवडे यांनी माहिती दिली आहे.

जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जुन्नर एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या आळेफाटा उपबाजार आवारात डाळिंबाची होण्यास सुरूवात झाली आहे. सुरुवातीला आळेफाटा उपबाजार समितीत एका दिवसाला 200 कॅरेट डाळिंबाची आवक होत होती. सुरुवातीला डाळिंबाला तीन हजार रुपये 20 किलोच्या कॅरेटला भाव मिळत होता.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जुन्नर एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या आळेफाटा उपबाजार समितीत गुरुवार वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवस डाळिंबाचा लिलाव भरत असतो. सध्या उपबाजार समितीच्या आवारात दर्जेदार डाळिंबाची आवक होत आहे. यामुळे डाळिंबाला विक्रमी बाजार भाव देखील आता मिळू लागला आहे.

डाळिंब खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तसेच निर्यातदारांच्या मते, पावसाळी हंगाम सुरू झाल्याने तसेच आंब्याचा हंगाम संपुष्टात येत असल्याने सध्या डाळिंबाच्या फळाला मोठी मागणी आहे. डाळिंबाच्या फळाला राज्यातून तसेच परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने डाळिंबाला आता उच्चांकी बाजार भाव मिळत आहे.

रविवारी उपबाजार समितीच्या आवारात लिलावासाठी आलेल्या डाळिंबाच्या एका कॅरेटला 5000 रुपयाचा विक्रमी भाव मिळाला. या दिवशी उपबाजार समितीच्या आवारात एकूण 960 कॅरेट डाळिंबाची आवक झाल्याचे बाजार समितीच्या प्रशासनाने सांगितले. निश्चितच सध्या डाळिंबाला उच्चांकी भाव मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी सुखावला असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link