पुष्पा चित्रपटांमधील लाल सोना, रक्तचंदन म्हणजे नेमकं काय? आपण करू शकतो का, रक्तचंदनाची शेती? - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

पुष्पा चित्रपटांमधील लाल सोना, रक्तचंदन म्हणजे नेमकं काय? आपण करू शकतो का, रक्तचंदनाची शेती?

0
5/5 - (2 votes)

सध्या सोशल मीडिया आणि प्रत्येकाच्या मनामध्ये धुमाकूळ घालत असलेला चित्रपट म्हणजेच ‘पुष्पा ‘ (puspa movie).
या चित्रपटाची कहाणी सुरू होते ती रक्तचंदन पासून. बहुतांश चित्रपट आपण मनोरंजनासाठी बघतो .पण हे चित्रपट आपल्याला खूप काही शिकवून जातात .पुष्पा चित्रपटाच्या कथेचा सर्वात मोठा आधार म्हणजे आहे’ रक्तचंदन’. याबद्दल त्यामध्ये एक डायलॉग म्हटलेला आहे “सोना है ये सोना” खरंच आहे का हो हे सोन ?काय आहे हे रक्तचंदन? आंतरराष्ट्रीय बाजारात याला खरंच आहे का एवढी मागणी ? आपण करू शकतो का ‘रक्त चंदनाची’ शेती ? या सर्वांबद्दल आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला इथे मिळणार आहे ?तर चला जाणून घेऊया रक्तचंदना बद्दल आजच्या या लेखामध्ये…..

भारतामध्ये रक्तचंदन कुठे आढळते?

दक्षिण भारतात, प्रामुख्याने दक्षिण-आंध्र प्रदेश तामिळ नाडूमधील शेलाचेलम च्या जंगलामध्ये ,
दक्षिण-पूर्व कर्नाटक, उत्तर तामिळनाडू, अंदमान आणि महाराष्ट्रातील कोरड्या, डोंगराळ भागात सुमारे 150-900 मीटर उंचीवर आढळते. काही विद्वान रक्त-चंदनाच्या जागी कुचंदन किंवा पंतराग घेतात, परंतु हे तिन्ही एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. रक्त चंदन आणि पंत्राग या झाडांमध्ये काही प्रमाणात साम्य असले तरी आणि अनेक ठिकाणी चंदनाच्या जागी पंत्रग लाकडाचा वापर औषधी कारणांसाठी केला जातो. तथापि, हे दोघे एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत.

रक्तचंदना च्या झाडाचा परिचय :

रक्तचंदन म्हणजे नेमकं काय? तर हे एक प्रकारचे वृक्ष आहे. जे जंगलामध्ये आढळते. चंदन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे पांढरे चंदन. पण हे रक्तचंदन नेमकं काय? ज्याप्रमाणे पांढरे चंदन आहे. त्याप्रमाणेच लाल चंदन हे आयुर्वेदिक ,धार्मिक, शोभेच्या वस्तू ,फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाणारे चंदन आहे .त्याच्या झाडाबद्दल जाणून घ्यायचा असेल .तर त्याचे झाड हे 8-11 मीटर उंच, मध्यम आकाराचे, दाट फांद्या असलेले, पानगळीचे झाड आहे. त्याच्या फांद्या राखाडी रंगाच्या असतात. त्याची साल 1-1.5 सेंटीमीटर जाड, तपकिरी-तपकिरी रंगाची असते आणि खराब झाल्यावर त्यात गडद रक्तरंजित स्त्राव असतो. त्याचा आतील भाग गडद रक्ताचा किंवा गडद-जांभळ्या रंगाचा असतो. त्याची पाने कंपाऊंड, 10-18 सेंमी लांब, लंबवर्तुळाकार, गोलाकार असतात आणि प्रत्येक पेटीओलवर सहसा तीन किंवा पाच पाने असतात. त्याची फुले 2 सेमी लांब, सुवासिक, द्वि-लैंगिक, पिवळसर, लहान, सुमारे 5 मिमी लांब असतात. त्याच्या शेंगा 3.8-5 सेमी व्यासाच्या असतात. बिया 1-2 संख्येने, लंबवर्तुळाकार, 1-1.5 सेमी लांब, रक्तरंजित तपकिरी रंगाच्या, गुळगुळीत आणि चामड्याच्या असतात. त्याचा फुलांचा आणि फळांचा कालावधी जानेवारी ते मे पर्यंत असतो.

सर्वांपेक्षा वेगळे अस्तित्व निर्माण करणारी याच्यामध्ये कोणती गोष्ट आहे?

हे चंदनाचे लाकूड इतर लाकडापेक्षा अधिक वेगाने पाण्यामध्ये बुडते. हीच याच्या खऱ्या शुद्ध तिची ओळख आपल्याला करून देते. यामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चन्दनाचा रंग रक्ता सारखा लाल आहे .म्हणूनच त्याला रक्तचंदन असे म्हटले जाते. याच्या झाडाची सरासरी उंची आठ ते अकरा मीटर असते आणि हे झाड सावकाश वाढते. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये चित्तूर ,कडप्पा, कुरुल आणि नेल्लोर या जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या शेलाचेलम च्या पर्वतरांगांमध्ये रक्तचंदन मोठ्या प्रमाणावर आढळते.

परदेशामध्ये खरंच आहे का याची मागणी?

रक्तचंदनाला आशियाई देशात सर्वात जास्त मागणी आहे. चीन ,जपान, सिंगापूर ,ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब, अमीरात या भागात रक्तचंदनाची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. इतर देशांच्या तुलनेत चीनमध्ये याला सर्वात जास्त मागणी आहे .चीनमध्ये सतराव्या शतकाच्या मध्यम मिनिंग वंशाच्या राजवटीत या लाल चंदनाला अधिक मागणी होती. या चंदनाच्या वस्तू बाजारपेठेमध्ये अधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे या चंदनाला मोठ्या प्रमाणात देशात व परदेशात मागणी आहे.

रक्त चंदनाची किंमत ?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार करता .रक्तचंदनाची किंमत 3 हजार रुपये प्रति किलो किती आहे .

रक्त चंदनाची शेती आपण करू शकतो का?


रक्तचंदना ची शेती करून शेतकरी लाखो रुपये नाही .तर करोडो रुपयाचे उत्पन्न घेऊ शकतो .आणि करोडपती बनू शकतो पण रक्तचंदन शेती ही सरकार मान्य आहे का ? आपण रक्त चंदनाची शेती करू शकतो का तर याबद्दल आपण पुढील लेखामध्ये बघणार आहोत.

Tags:
Rakt chandan, rakt chandan plant, red sandal wood plant, what is rakt chandan, all about rakt chandan, puspa movei rakt chandan plant, rakt chand tree, rakt chandan baddal mahiti , pushpa, news about pushpa,

Share via
Copy link