[ad_1]
उन्हाने अंगाची लाहीलाही झाल्यावर आता सोमवार (ता. ०७) आणि मंगळवार (ता. ०८) मार्चला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिला आहे. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि आसपासच्या परिसरातील सकाळचे ढगाळ हवामान आजही कायम होते. मागच्या दोन आठवड्यांपासून राज्यात सूर्य आग ओकत असून मार्चच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा (maximum temperature) ३७ अंशांच्या पार गेलाय. त्यामुळे भाजीपाला पिकांना पाण्याची गरज भासत आहे.
सध्या राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून, सकाळी मुख्यतः ढगाळ हवामानाचे (cloudy weather) राज्य दिसतेय. तर दुपारच्या वेळी उकाडा वाढला असून राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये सातत्याने ३४ ते ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे.
हे देखील वाचा : अबब… मार्चमध्येच राज्यातील ‘या’ भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान!
सोमवारी (ता. ०७) पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडू शकतात. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, आणि जळगाव जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. तसेच मंगळवारी (ता. ०८) राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता (light rains) आहे.
हा व्हिडिओ पाहिलात का? :
मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, परभणी, आणि हिंगोली या दहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पुण्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट (thunderstorms) होऊ शकतो, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.