MSRTC Bharti – ST महामंडळात 10 हजार चालकांची डायरेक्ट भरती, नवीन जाहिरात निघाली, हि आहे शेवटची तारीख... - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

MSRTC Bharti – ST महामंडळात 10 हजार चालकांची डायरेक्ट भरती, नवीन जाहिरात निघाली, हि आहे शेवटची तारीख…

1
5/5 - (4 votes)

ST Bus Diver Vacancy New Update | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (MSRTC) महामंडळाने 10 हजार चालकांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. संपाचा पेच कायम असताना उच्च न्यायालयातून वारंवार तारखा मिळत असल्याने प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. संपकरी (Marathi News) कर्मचाऱ्यांपैकी 10 मार्च अखेर 30 हजार 112 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

ST Mahamandal Bharti 2022

एसटीत १० हजार कंत्राटी कामगारांची भरती लवकरच अपेक्षित

ST Mahamandal taking a very big decision regarding the Driver Bharti on Contract Basis. As per the latest News ST Mahamandal will be recruitmenting 10000 Driver Post soon as a contract basis. Transport Minister Anil Parab said that most of the recruits are administrative level officials. The number of driver carriers is low. 10,000 employees will be recruited in phases, out of which about 2,000 drivers have been recruited. Read the complete details given below and keep visit us for the further updates.

राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केलेल्या शिफारसीमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिला. या अहवालाचा आधार घेऊन परिवहनमंत्री अनिल परब यांनी कारवाई मागे घेण्यास तयार असल्याचे सांगत कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद वाढत असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.

कामावर रुजू होणाऱ्यामध्ये प्रशासकीय दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश अधिक आहे. चालक वाहकांची संख्या कमी आहे. टप्याटप्याने १० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून, यापैकी जवळपास दोन हजार चालकांची भरती झाली आहे. या चालकांच्या मदतीने राज्यात चार हजार गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या असून, त्यांच्या मदतीने १३ हजार फेऱ्या धावल्या आहेत, असा दावा एसटी महामंडळाचा आहे.

महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळातील ९२ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यातील ३० हजार ११२ कर्मचारी कामावर रुजू झाले असून अद्याप ५१ हजार ५७१ कर्मचारी संपावर ठाम आहेत. ११,२४३ कर्मचारी निलंबित असून १०,२४९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेले आहेत. देशातील सर्वांत मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या एसटी महामंडळात महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी ऑक्टोबर २०२१ पासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.


चार मार्चपासून कारवाई बंद

  • मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत शिस्तभंगाची कारवाई न करण्याच्या तोंडी सूचना एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, मंत्री अनिल परब यांच्या मार्गदर्शनानुसार महामंडळाने चार मार्चपासून कारवाई बंद केलेली आहे. ४ मार्चपर्यंत ११ हजार ४३३ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

Updated on 05.03.2022: ST Mahamandal Bharti 2022: The Satara divisional office has recruited 38 contract drivers and another 12 will be recruited by the corporation administration. The recruitment is being done on contract basis as the depots in the district are not yet running at full capacity. Read More details as given below.

MSRTC Satara Bharti 2022:  गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ राज्य परिवहन महामंडळाच्या कमचाऱ्यांचा संप सुरू आहे. सद्य:स्थितीत राज्यातील बहुतांशी आगारांत कर्मचारी पूर्ण क्षमतेने हजर झाले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा विभागीय कार्यालयाच्या वतीने ३८ कंत्राटी चालकांची भरती केली असून, अजून १२ चालकांची भरती करणार असल्याची माहिती महामंडळाच्या प्रशासनाने दिली आहे.

Batch Billa – बॅच बिल्ला मिळविण्यास लागणारी कागदपत्रे

महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्‍यांसाठी मागील चार महिन्यांपासून संप पुकारला आहे. दिवाळीचा सण सुरू असताना संप सुरू झाल्याने अनेक चाकरमान्यांचे हाल झाले होते. महामंडळातील संघटनांनी राज्य शासनात विलीनीकरण ही मुख्य मागणी करून हा संप ताणला. त्यानंतर कर्मचारी संघटना व परिवहनमंत्र्यांनी तीन बैठका घेऊन सुमारे ४१ टक्के पगारवाढ केली. तरीदेखील कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण या मुद्यावर ठाम राहत संप सुरूच ठेवला. त्यानंतर महामंडळ प्रशासनाने कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत निलंबन केले.

या कारवाईमुळे आगारांतील ५० टक्‍क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे सलग दोन महिने बंद असलेली वाहतूक काही अंशी पूर्वपदावर येऊ लागली. मात्र, कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक व वाहकांची संख्या अल्प प्रमाणात आहे. साताऱ्यातील ११ आगारांमध्ये केवळ २० ते २२ टक्के चालक व वाहक हजर असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येताना खोळंबा होत आहे. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातून शाळा, महाविद्यालये, नोकरीनिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी महामंडळ प्रशासनाने कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘‘प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी सद्य:स्थितीत ३८ चालकांची भरती केली आहे. तसेच भरतीची प्रक्रिया सुरू असून अजून १२ चालक भरले जाणार आहेत. जिल्ह्यातील आगारांतून अद्यापही पूर्ण क्षमतेने फेऱ्या सुरू नसल्याने कंत्राटी भरती केली जात आहे.’’


Although the ST workers are still on strike demanding the merger of ST with the government, it is not possible to merge ST. A committee headed by the chief secretary has recommended that the union not accept the demand. After presenting the report of the committee before both the houses of the legislature today, Transport Minister Anil Parab appealed to the ST workers to come to work by March 10. “ST employees should start work within the given time, otherwise they will have to be recruited on contract basis,” Parab told the media.

Updated On 05.03.2022: एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱयांचा संप अद्यापही सुरू असला तरी एसटीचे विलीनीकरण करणे शक्य नाही. कर्मचारी संघटनांची ही मागणी मान्य करू नये अशी शिफारस मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने केली आहे. समितीचा हा अहवाल आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर ठेवल्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱयांना 10 मार्चपर्यंत कामावर या, असे आवाहन केले. एसटी कर्मचाऱयांनी दिलेल्या मुदतीत कामावर रुजू व्हावे अन्यथा कंत्राटी पद्धतीने भरती करावी लागेल, असेही परब यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

 महामंडळाच्या कर्मचाऱयांना राज्य सरकारी कर्मचारी समजण्यात यावे या मागणीचा विचार करण्याकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीने आपला अहवाल दिला. हा अहवाल आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर केला.

 महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करणे व सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर कोणत्या योजना राबवता येतील याच्या अभ्यासासाठी ‘केपीएमजी’ची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल महिनाअखेरपर्यंत येणे अपेक्षित असून त्यातील शिफारशीनुसार उपाययोजना करण्यात येतील, असे महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने  यांनी स्पष्ट केले आहे.


Palghar MSRTC Driver Bharti 2022 update : As per the latest news, Due to the strike by the employees of the MSRTC the number of ST round trips in rural areas has been reduced and passengers have to face difficulties in getting to the city. In this background, the corporation administration informed that 50 contract drivers will be recruited on behalf of Palghar divisional office.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये (Maharashtra government) विलीनीकरण व्हावे, यासाठी नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेले एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन (Strike) अजूनही सुरू आहे. पालघर जिल्ह्यात निम्म्याहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले नसल्याने बस फेऱ्यांमध्ये घट झाली आहे. त्याचा फटका नागरिकांना बसतो आहे. मात्र आता बारावीच्या परीक्षा (HSC exam) सुरू होणार असून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने पालघर जिल्ह्यात ५० वाहकांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी महामंडळातर्फे (St bus corporation) विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अधिकाधिक फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटीच्या संपाचा सर्वाधिक त्रास महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. अनेक कर्मचारी संप मागे घेत कामावर रुजू झाले आहेत. मात्र एसटीच्या प्रतिदिन ३७० धावणाऱ्या बस आता ८० वर आल्या आहेत. त्यामुळे एसटीची सेवा सुरू असली तरी ती पुरेशी नाही. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू होऊनही एसटी सेवा नसल्याने खासगी वाहतुकीमध्ये अधिक भुर्दंड या विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. मात्र आता विद्यार्थ्यांसाठी बसच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटी महामंडळाकडून पालघर जिल्ह्यात एकूण ५० ठेक्यावरील वाहक देण्यात आले आहेत. या वाहकांमार्फत एसटी चालणार असून येत्या आठवड्यात ते रुजू होणार आहेत.


Satara MSRTC Driver Bharti 2022 update : As per the latest news, Due to the strike by the employees of the MSRTC the number of ST round trips in rural areas has been reduced and passengers have to face difficulties in getting to the city. In this background, the corporation administration informed that 50 contract drivers will be recruited on behalf of Satara divisional office.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांच्या संपामुळे ग्रामीण भागातील एसटी फेऱया कमी असल्याने प्रवाशांना शहरात येताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा विभागीय कार्यालयाच्या वतीने 50 कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळ प्रशासनाने दिली आहे.

  • महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी मागील तीन महिन्यांपासून संप पुकारला आहे. ऐन दिवाळीत संप सुरू झाल्याने अनेक चाकरमान्यांचे हाल झाले होते. कर्मचारी संघटना व परिवहनमंत्र्यांनी तीन बैठका घेऊन सुमारे 41 टक्के पगारवाढ केली.
  • तरीदेखील कर्मचाऱयांनी विलीनीकरण या मुद्यावर ठाम राहात संप सुरूच ठेवला. त्यानंतर महामंडळ प्रशासनाने कामावर हजर न होणाऱया कर्मचाऱयांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांचे निलंबन केले. या कारवाईमुळे आगारांतील 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे सलग दोन महिने बंद असलेली वाहतूक काहीअंशी पूर्वपदावर येऊ लागली आहे.
  • जिह्यातील आगारांतून अद्यापही पूर्ण क्षमतेने फेऱया सुरू नाहीत. त्यामुळे कंत्राटी चालकांची भरती केली जाणार आहे. याबाबत कंत्राटी कर्मचाऱयांच्या ठेकेदारांशी चर्चा झाली असून, लवकरच कर्मचारी देण्याची मागणी केली आहे. जेणेकरून जिह्यात फेऱयांची संख्या वाढून प्रवाशांची गैरसोय दूर केली जाणार आहे, असे वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी सांगितले.

 MSRTC तर्फे शिकाऊ उमेदवारांसाठी भरती सुरु

ST Mahamandal Bharti 2022: The Pune Division of Maharashtra State Road Transport Corporation has started the recruitment process for the post of Apprentice. The advertisement for this post has been published on the website. Applications for the post can be submitted till 04 March 2022. The department has appealed to the interested candidates to fill up the application. The advertisement has been published on the website www.apprenticeship.gov.in.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातर्फे शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पदासाठीची जाहिरात संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी ४ मार्च पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी विभागाने आवाहन केले आहे . www.apprenticeship.gov.in या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

MSRTC Bharti 10000 Drivers
Share via
Copy link