Samaj Kalyan Yojna | गणवेश, बूट साठी या विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदान
Samaj Kalyan Yojana : नमस्कार मित्रांनो, मित्रांनो समाज कल्याण विभागामार्फत शासकीय वस्तीग्रह निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश,रेनकोट आणि बूट. अशा शालोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी त्या विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात वरती 2642 रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे. यांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 9 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे.
हे पण वाचा : Shet Rasta Kayda | शेतरस्ता हवा असेल तर मग जाणून घ्या शेतरस्ता कायदा
मित्रांनो शासकीय वस्तीग्रह निवासी शाळातील विद्यार्थ्यांना गणवेश बुटाचे वाटप केलं जातं. परंतु या वाटपात होणाऱ्या अपहार विद्यार्थ्यांना न मिळणाऱ्या वस्तू या सर्वांच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. याचबरोबर शासनाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे अनुदान आता डी .बी .टि च्या स्वरूपात देण्यासाठी जी तयारी सुरू आहे त्या पद्धतीने अंमलबजावणी केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवरती 2016 मध्ये घेतलेल्या शासन निर्णयानुसार,आता या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावरती या गणवेशासाठी बुटासाठी आणि रेनकोटसाठी दिली जाणारी रक्कम ही क्रेडिट करण्यासाठी वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांना बूट याचप्रमाणे शालेय गणवेश पि .टि गणवेश. बूट आणि रेनकोट असे चार वस्तू खरेदी करण्यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे.
हे पण वाचा : कृषी ड्रोन योजना 2022 काय आहे? अनुदान| प्रशिक्षण| ठरवलेल्या अटी
याच्यामध्ये बूट खरेदी करण्यासाठी द्या खरेदी करण्यासाठी डर्बी / बेली शुज फोम लेदरअप्पर विथ pvc सोल अशा प्रकारचे आकार मानस ज्याची शासन प्राप्त किंमत 285 रुपये असेल. याप्रमाणे शालेय युनिफॉर्म साठी 926 रुपये P.T युनिफॉर्म साठी 945 रुपये तर रेनकोट खरेदीसाठी 491 रुपये अशा प्रकारे एका विद्यार्थ्याला 264२ रुपये एवढी रक्कम प्रतिवर्षी या ठिकाणी दिली जाणार आहे.
याच्यासाठी विद्यार्थ्याने शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर या विद्यार्थ्यांची नोंद झाल्यानंतर त्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये 60 टक्के रक्कमही जमा केली जाणार आहे. याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या माध्यमातून हा गणवेश बूट रेनकोट इत्यादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्या पावत्या शाळेमध्ये जमा केल्यानंतर त्याचा डाटा दिल्यानंतर उर्वरित 40 टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
आधार संलग्न बॅंक खात्यावर ती लाभ देण्याची कारवाई आहे ही अतिशय गोपनीय पद्धतीने केली जाणार आहे. याच्या लाभार्थी याद्या किंवा यांच्या बद्दलची माहिती कुठले प्रकारे सामाजिक रीत्या प्रकाशित केली जाणार नाही. अशा प्रकारचे गोपनीय माहितीसह या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रतिवर्षी युनिफॉर्म बूट आणि रेनकोट खरेदीसाठी 2642 रुपये एवढी रक्कम देण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.
शासन निर्णय आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता