Land Record सातबारा उताऱ्यामध्ये झाले हे 11 मोठे बदल माहिती नसेल तर खावी लागेल जेलची हवा - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Land Record सातबारा उताऱ्यामध्ये झाले हे 11 मोठे बदल माहिती नसेल तर खावी लागेल जेलची हवा

0
4.9/5 - (9 votes)
 1. ‘गाव नमुना-7’ मध्ये गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक म्हणजेच Local Government Directory टाकण्यात येणार आहे.
 2. लागवडी योग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्ररित्या दर्शवून त्यांची एकूण बेरीज करून एकूण क्षेत्र नमूद करण्यात येणार आहे.
 3. शेती क्षेत्रासाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार असून बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार आहे.
 4. यापूर्वी खाते क्रमांक ‘इतर हक्क’ या रकान्यात नमूद केला जात असे. आता तो खातेदाराच्या नावासमोरच नमूद केला जाणार आहे.

 1. यापूर्वी मयत खातेदार, कर्ज बोजे, ई-कराराच्या नोंदी कंस करून दाखवल्या जात होत्या. आता ही माहिती कंस करून त्यावर एक आडवी रेष मारून त्यांना खोडलेलं दाखवण्यात येणार आहे
 2. जे फेरफार प्रलंबित आहेत, ते इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे ‘प्रलंबित फेरफार’ म्हणून नोंदवण्यात येणार आहे.
 3. गाव नमुना-7 मधील सर्व जुने फेरफार क्रमांक आता नवीन नमुन्यात सर्वांत शेवटी ‘जुने फेरफार क्रमांक’ या नवीन रकान्यात एकत्रितरित्या दर्शवण्यात येणार आहे.
 4. दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष काढण्यात येईल, जेणेकरूण खातेदारांची नावं स्पष्टपणे दिसतील.

 1. गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे, त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सगळ्यांत शेवटी ‘शेवटचा फेरफार क्रमांक’ आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद करण्यात येणार आहे.
 2. बिनशेतीच्या सातबारा उताऱ्यावरील शेतजमिनीचं एकक ‘आर चौरस मीटर’ राहणार असून यात पोट खराब क्षेत्र, जुडी आणि विशेष आकारणी, तसंच इतर हक्कात कुळ आणि खंड हे रकाने वगळण्यात येणार आहेत.
 3. बिनशेतीच्या सातबारा उताऱ्यात सगळ्यांत शेवटी “सदरचं क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर-12ची आवश्यकता नाही” अशी सूचना देण्यात येणार आहे.

याशिवाय, 3 मार्च 2020 ला महाराष्ट्र सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर वरच्या बाजूला महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यास मान्यता दिली.

सातबारा उताऱ्यात झाले हे ११ मोठे बदल
Share via
Copy link