Shetakari KarjMafi Maharashtra | मराठवाडा विदर्भातील या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Shetakari KarjMafi Maharashtra | मराठवाडा विदर्भातील या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी

2
5/5 - (2 votes)

नमस्कार मित्रांनो,मित्रांनो विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या कर्जमाफीच्या संदर्भातील एका अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 18 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आह.  या शासन निर्णयाच्या माध्यमातून खाजगी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या कर्जमाफीसाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 10 एप्रिल 2015 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाडा मधील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची खाजगी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. 

हे पण वाचा : Ativrushti Nuksan Bharpai 2022 | राज्यातील १० जिल्ह्याना अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर ! पहा तुमचा जिल्हा आहे का

मात्र ही मंजुरी देत असताना ज्या सावकाराने कार्य क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलेली आहेत. अशा शेतकऱ्यांना अशा सावकारांना याच्यामधून बात करण्यात आलेल होतं. मात्र याच्यासाठी 13 सप्टेंबर 2019 रोजी एक शासन निर्णय घेऊन या शेतकऱ्यांचा देखील याच्यामध्ये पात्रते मध्ये समावेश करण्यात आलेला होता. याच्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. 

मित्रांनो या जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाडा मधील 14 जिल्ह्यातील 3749 शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेलं होतं. ज्याच्यासाठी 9 कोटी 4 लाख रुपये एवढे निधीची तरतूद देखील करण्यात आलेली होती.  मित्रांनो  याच निधीपैकी  2020 ते 2021 मध्ये 3.75 कोटी आणि चालू आर्थिक वर्षात 2022-23  मध्ये एक कोटी असा 4.75 कोटी रुपये निधी यापूर्वीच वितरित करण्यात आलेला होता.  या निधीपैकी उर्वरित असलेला 4 कोटी 28 लाख 59 हजार रुपये एवढा निधी आजचे शासन निर्णय च्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 

हे पण वाचा : LPG GAS : आता घरगुती गॅस सिलेंडर वर “QR CODE” बसवणार,जाणून घ्या फायदे आणि कस काम करणार

त्यांच्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कार्य क्षेत्राबाहेरील परवानाधारा सावकाराकडून घेतलेले कर्ज आता माफ होणार आहेत. त्या कर्जाची कर्जमाफी या निधीच्या माध्यमातून केले जाणार आहे.याच्या साठी 10 एप्रिल 2015 याचप्रमाणे 13 सप्टेंबर 2019 रोजी च्या शासन निर्णयानुसार अटी शर्ती ची पूर्तता करून या निधीचे वितरण केले जाणार आहे. अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण शासन निर्णयामुळे या सावकाराकडून कर्ज माफी च्या प्रतीक्षेत असणाऱ्या या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आपण mharashtra.gov.in पाहू शकता.

शासन निर्णय येथे पहा

finger down

येथे पहा

Share via
Copy link