Shetkari Karjmafi Yojana 2022: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर! असे चेक करा यादीत नाव - Amhi Kastkar

Shetkari Karjmafi Yojana 2022: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर! असे चेक करा यादीत नाव

4.6/5 - (19 votes)

Shetkari Karjmafi Yojana 2022: सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंत लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. Shetkari Karjmafi Yojana 2022: These farmers of Mahatma Jyotirao Phule loan waiver scheme will get fifty thousand rupees

ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

50000 anudan yojana maharashtra list

या यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन श्री. सावे यांनी केले.

सन २०१७ – १८, २०१८ – १९ व २०१९ – २० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करुन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित कालावधीत परतफेड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना यादी डाउनलोड

यामध्ये प्राथमिकदृष्ट्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धीसाठी बँकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या विशिष्ट क्रमांकासह शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरणासाठी जावयाचे आहे.

त्याठिकाणी संगणकावर दिसत असलेल्या कर्जखात्यांचा तपशील, आधार क्रमांक इत्यादी बाबींची खातरजमा करुन शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यामध्ये थेट प्रोत्साहनपर लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही  करण्यात येणार आहे.

यादी संबंधित बँक शाखा विविध कार्यकारी सेवा, सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय, इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्ज खाते, पासबुक, व बचत खाते पासबुक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे सावे यांनी बोलताना सांगितले आहे.

◆ अनुदान जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे

  • लाभार्थी यांचे आधार कार्ड घेऊन CSC सेंटरवर जाणे
  • लाभार्थी यादीत आपले नाव आहे की, नाही ते पहाण्यासाठी आपल्या जवळच्या Csc सेंटरशी संपर्क साधावा.
  • यादीमध्ये नाव असेल तर शेतकऱ्यांचा केवायसी अंगठा करावा लागेल.
  • अंगठा केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्याच्या अकाउंटला अनुदान जमा होणार आहे.

Download pdf karjmafi anudan yojana maharashtra list

सोलापूर जिल्हा कर्जमाफी अनुदान यादी डाउनलोड कशी करावी?

नांदेड जिल्हा कर्जमाफी अनुदान यादी डाउनलोड कशी करावी?

रत्नागिरी जिल्हा कर्जमाफी अनुदान यादी डाउनलोड कशी करावी?

ठाणे जिल्हा कर्जमाफी अनुदान यादी डाउनलोड कशी करावी?

लातूर जिल्हा कर्जमाफी अनुदान यादी डाउनलोड कशी करावी?

जालना जिल्हा कर्जमाफी अनुदान यादी डाउनलोड कशी करावी?

वाशीम जिल्हा कर्जमाफी अनुदान यादी डाउनलोड कशी करावी?

कोल्हापूर जिल्हा कर्जमाफी अनुदान यादी डाउनलोड कशी करावी?

अहमदनगर जिल्हा कर्जमाफी अनुदान यादी डाउनलोड कशी करावी?

बीड जिल्हा कर्जमाफी अनुदान यादी डाउनलोड कशी करावी?

औरंगाबाद जिल्हा कर्जमाफी अनुदान यादी डाउनलोड कशी करावी?

यवतमाळ जिल्हा कर्जमाफी अनुदान यादी डाउनलोड कशी करावी?

पुणे जिल्हा कर्जमाफी अनुदान यादी डाउनलोड कशी करावी?

हि माहिती इतरांना नक्की शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्याच्या याद्या वर पैकी नसतील, तर कमेंटमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव द्या.

Shetkari Karjmafi Yojana 2022

1 thought on “Shetkari Karjmafi Yojana 2022: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर! असे चेक करा यादीत नाव”

Leave a Comment

Share via
Copy link