Shetmal Taran Karj Yojana 2021-2022 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतमाल तारण कर्ज योजना या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच या (Commodity mortgage loan scheme) योजने अंतर्गत कोणकोणत्या शेतमालासाठी कर्ज मिळेल व कर्ज वाटपाची मर्यादा किती, परतफेडीची मुदत आणि व्याजदर इत्यादी बद्दल सविस्तर या लेखात तुम्हाला मिळणार आहे, तरी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
शेतमाल तारण कर्ज योजना संपूर्ण माहिती
शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिकपातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार पेठेत विक्रीसाठी येतो. साहजीकच शेतमालाचे (Commodity mortgage loan scheme) बाजार भाव खाली येतात. सदर शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टीकोनातून कृषि पणन मंडळ सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.
Commodity mortgage loan scheme information in Marathi
या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा व हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला असुन या योजने (Commodity mortgage loan scheme) अंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते. सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असुन सहा महिन्यांचे आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते.
शेतमालाचे प्रकारानुसार तारण कर्जाची मुदत व व्याजदर
अ.क्र | शेतमाल प्रकार | कर्ज वाटपाची मर्यादा | मुदत | व्याज दर |
---|---|---|---|---|
१. | सोयाबीन, तुर, मुग, उडिद, चना, भात (धान) करडई, सुर्यफूल, हळद | प्रत्यक्ष बाजारभावानूसार एकूण किंमतीच्या 75% रक्कम. | ६ महिने | ६ टक्के |
२. | ज्वारी, बाजरी, मका व गहू | एकुण किंमतीच्या 50% रक्कम. (रू. 500/- प्रती क्विंटल अथवा प्रत्यक्ष बाजार भाव यापैकी कमी असणारी रक्कम) | ६ महिने | ६ टक्के |
३. | काजू बी | एकूण किंमतीच्या 75% रक्कम. (रु.50 प्रति किलो अथवा प्रत्यक्ष बाजार भावाची किंमत यापैकी कमी असेल ती रक्कम | ६ महिने | ६ टक्के |
४. | बेदाणा | एकुण किंमतीच्या कमाल 50% किंवा जास्तीत जास्त रु. 50,000/- प्रति मे.टन यातील कमी असणारी रक्कम | ६ महिने | ६ टक्के |
शेतमाल तारण कर्ज योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये, अटी व शर्ती
- शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतीमाल स्विकारला जातो. व्यापाऱ्यांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्विकारला जात नाही.
- प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किमंत ही त्यादिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरविण्यात येते
- तारण कर्जाची मुदत 6 महिने (180 दिवस) असुन तारण कर्जास व्याजाचा दर 6% आहे.
- बाजार समितीकडून कृषि पणन मंडळास 3% प्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड. (उर्वरीत 3% व्याज बाजार समितीस प्रोत्साहनपर अनुदान). मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलात नाही.
- महिने (180 दिवस) मुदतीनंतर सहा महिन्यापर्यत 8 टक्के व्याज दर व त्याचे पुढील सहा महिन्याकरिता 12 टक्के व्याज दर आकारणी केली जाते. 6. तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणुक, देखरेख व सुरक्षा बाजार समिती विनामुल्य करते.
- तारणातील शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी संबंधीत बाजार समितीची राहते.
योजनेचा अर्ज आणि इतर माहिती PDF Download करण्यासाठी इथे क्लिक करा.
शेतमाल तारण कर्ज योजना Shetmal taran karj yojana Maharashtra साठी लागणारी कागदपत्रे :-
- लाभार्थ्यांचे आधारकार्ड
- लाभार्थ्यांचे सातबारा
- बँकेतील वचन चिठ्ठी
- सभासदत्व अर्ज
- पॅन कार्ड (असेल तर )
- तारण म्हणून घेतलेल्या मालाची पोहचं पावती
मित्रानो शेतमाल तारण कर्ज योजना साठी लागणाऱ्या अर्जाचा नमुना आपण या लेखामध्ये दिला आहे. तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून शेतमाल तारण कर्ज योजना साठी लागणाऱ्या अर्जाचा नमुना डाऊनलोड करून पाहू शकता. व या अर्जासोबत इतर जमा करायची सर्व कागदपत्रे दिलेली आहे. ते जोडून जमा करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात
शेतमाल तारण कर्ज योजना साठी लागणाऱ्या अर्जाचा नमूना arj namuna PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
हे वाचलंत का?
- Leading 12 greatest army online dating sites in 2019
- Tips Bounce Straight Back After a primary Date Screw-Up
- Meilleur gratuit Lignes de chat pour des rencontres en 2021
- Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल “इतके रुपये” स्वस्त! तात्काळ आपल्या गाडीची टाकी फुल करा
- Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल “इतके रुपये” स्वस्त! तात्काळ आपल्या गाडीची टाकी फुल करा