Shinde Fadnavis Goverment | शिंदे-फडवणीस सरकार 1 लाख रोजगार देणार । शिंदे-फडवणीस सरकारचा मोठा निर्णय… - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Shinde Fadnavis Goverment | शिंदे-फडवणीस सरकार 1 लाख रोजगार देणार । शिंदे-फडवणीस सरकारचा मोठा निर्णय…

1
5/5 - (4 votes)

Shinde Fadnavis Goverment : नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील मोठे मोठे उद्योग, प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात असल्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडवणीस सरकारवर आरोप करण्यात आला होते. राज्यातील हे प्रकल्प इतर राज्यात जात असल्यामुळे महाराष्ट्रातल्य तरुणांचे रोजगार बुडत आहे. या मुद्यावरून सातत्याने विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे फडणीस सरकारवर आरोप केले जात होते. या मुद्द्यावर जोरदार राजकारण रंगले असतानाच, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 

हे पण वाचा : Crop Insurrance Claim 2022 । सर्व पीक विमा दावे मंजूर । शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा रक्कम तात्काळ जमा करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कौशल्य विभागाच्या पुढाकाराने एक लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत.  त्यामुळे आता शिंदे फडवणीस सरकार एक लाख तरुणांना रोजगार देणार आहे. राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींनसाठी  शिंदे फडवणीस सरकारचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचे मानले जात आहे.

राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोशयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राज भवन आयोजित कार्यक्रमात 1 लाखाहून अधिक रोजगारासाठी हे सामंजस्य करार करण्यात आले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि मी असा निर्णय घेतला आहे की आमच्या सरकारचा सर्वाधिक भार रोजगारावर असला पाहिजे.

हे पण वाचा : Shet Rasta Kayda | शेतरस्ता हवा असेल तर मग जाणून घ्या शेतरस्ता कायदा

 नोकरीची संधी होणार उपलब्ध

सरकारच्या या करारामुळे बांधकाम, रिटेल, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रात नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे. या करारामुळे अगदी दहावी नापास ते उच्चशिक्षित तरुणांना व तरुणींना त्यांच्या पात्रतेनुसार नोकऱ्या मिळण्याची समजले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोजगार देण्याचा निर्णय देण्याचा जाहीर केला होता. तसेच राज्य सरकारच्या वतीने 75 हजार बेरोजगारांना नोकरी देणार असून,त्यासोबत  खाजगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यायचा असे त्यांनी सांगितले. 

तसेच देशाचा आणि महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील 45 टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. नोकरीची संधी निर्माण करायची असेल तर कौशल्य विकास हे महत्त्वाचे माध्यम आहे.  त्यामुळे राज्यातील गुंतवणूक वाढण्यासाठी आम्ही हे करार करीत आहोत. यासाठी गेल्या काही दिवसापासून कौशल्य विभागाचे अधिकारी काम करत आहेत. 

हे पण वाचा : Samaj Kalyan Yojna | गणवेश, बूट साठी या विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदान

आम्हाला प्रशियन माणसे मिळत नाही असा उद्योजक सांगतात, तर तरुणांच्या हाताला काम नाही ही दरी संपवण्यासाठी कौशल्य विभाग आहे. रोजगार हा संवेदनशील विषय असून हाताला काम देणारे हातही निर्माण झाले पाहिजेत. या कार्यक्रमात 44 नामांकित उद्योजक प्लेसमेंट एजंसी कौशल्य विकास विभागाचे आयुक्त यांच्यासमवेत रोजगारासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे १  लाख 21 हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.(shinde fadnavis sarkar)

शिंदे-फडवणीस सरकार 1 लाख रोजगार देणार
Share via
Copy link