Shock to farmers heavy damage in 'this' taluka Learn the details | शेतकऱ्यांना धक्का 'या' तालुक्यात पावसाने मोठे नुकसान जाणून घ्या डिटेल्स - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Shock to farmers heavy damage in ‘this’ taluka Learn the details | शेतकऱ्यांना धक्का ‘या’ तालुक्यात पावसाने मोठे नुकसान जाणून घ्या डिटेल्स

0
Rate this post

[ad_1]

Shock to farmers.. heavy damage in 'this' taluka

Ahmednagar : मागच्या काही दिवसांपासून शहरासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरु आहे. या दमदार पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला (Akola) तालुक्यात असणाऱ्या मुळा पाणलोट क्षेत्रातील कोथळे (182 दशलक्ष घनफूट), शिरपुंजे (देव हंडी, 155) व आढळा पाणलोट क्षेत्रात पाडोशी (146 दशलक्ष घनफूट) ही जलाशये पूर्ण क्षमतेने भरली आहेत. 

तालुक्यातील घाटघर आणि रतनवाडी येथे सर्वाधिक नऊ इंच पावसाची नोंद झाली आहे.  यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे (farmers) मोठे नुकसान झाले आहे.  तर दुसरीकडे या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी महसूल विभागाने पंचनामे सुरू केले आहेत.

 मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा जलाशयात वेगाने पाण्याची आवक होत आहे. मागच्या चोवीस तासात या जलाशयात 760 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून आज सकाळी सहा वाजता जलाशयात 4656 दशलक्ष घनफूट साठा होता. 

तर दुसरीकडे वाकी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून, कृष्णवंती नदीत 1022 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे निळवंडे जलाशयात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोदणी वीज प्रकलपात वीजनिर्मिती सुरू झाली आहे.

निळवंडे जलाशयात 417 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून, जलाशयात 4051 दशलक्ष घनफूट साठा आहे, तर मुळा नदीपात्रात 9155 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. मुळा पाणलोट क्षेत्रातील कोथळा, देवहांडी जलाशय पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे मुळा जलाशयाकडे पाणी झेपावले आहे.

कोतूळ येथील नदीला पूर आला असून, पूल पाण्यात गेला आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. मुळा क्षेत्रात असलेल्या जानेवाडी, कुमशेत रस्त्यावर दरडी कोसळल्या असून, वाहतूक बंद आहे. विजेचे खांब पोल पडल्याने वीज दोन दिवसांपासून गायब आली आहे. बांध फुटले असून, भात रोपे पाण्याखाली गाडले गेलेले आहे, अशी माहिती सरपंच सयाजी अस्वले यांनी दिली आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link