Soybean Farming: नाचों रे…! सोयाबीनचं नवीन वाण झालं विकसित, शेतकऱ्यांची होणारं चांदी; वाचा सविस्तर - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Soybean Farming: नाचों रे…! सोयाबीनचं नवीन वाण झालं विकसित, शेतकऱ्यांची होणारं चांदी; वाचा सविस्तर

0
Rate this post

[ad_1]

Soybean Farming: भारतात खरीप हंगामातील (Kharif Season) यांची पेरणी जवळपास सर्व राज्यात आता आटपत आली आहे. सर्वत्र मोसमी पावसाने (Monsoon Rain) समाधानकारक हजेरी लावली असल्याने सोयाबीन पेरणीला (Soybean Sowing) देखील वेग आला आहे.

आपल्या राज्यातील अनेक भागात सोयाबीन (Soybean Crop) पेरणीची कामे कधीच पूर्ण झाली असून आता सोयाबीन अंकुरण पावला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारतात मध्यप्रदेश मध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.

मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात देखील सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. दोन वर्षांपूर्वी आपल्या राज्याने मध्य प्रदेश राज्याला धोबीपछाड देत सोयाबीन उत्पादनात अव्वल क्रमांक पटकावला होता. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या शिरेपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला होता.

यावरून आपल्याला महाराष्ट्रातील सोयाबीनचे क्षेत्र किती आहे हे लक्षात आलेच असेल. मित्रांनो आपल्या राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, जवळपास सर्वत्र सोयाबीन या पिकाची खरिपात करणी केली जाते. खरं पाहता सोयाबीन हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे.

राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे (farmer) सर्व अर्थकारण हे खरीप हंगामातील या मुख्य पिकावर अवलंबून असते. मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी या गेल्या उन्हाळ्यात सोयाबीन या खरीप हंगामातील मुख्य पिकाची लागवड करून दाखवली आहे.

यामुळे आता सोयाबीन फक्त खरीप हंगामाचे पीक राहिले नसून उन्हाळी हंगामामध्ये देखील सोयाबीनचे यशस्वी उत्पादन घेतले जाऊ शकते. दरम्यान, आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी झारखंडमधून समोर येत आहे.

मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे, देशातील तेलबिया पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांमार्फत नवीन वाण विकसित (Soybean Variety) केले जात आहेत. हे वाण जास्त उत्पादनासह कीड आणि रोगांना प्रतिरोधक आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च कमी होतो आणि अधिक उत्पादनातून उत्पन्नही जास्त मिळते. याचं अनुषंगाने अग्रगण्य कृषी विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे बिरसा कृषी विद्यापीठ, झारखंडने सोयाबीनची नवीन सुधारित जात (New Soybean Variety) “बिरसा सोयाबीन” – 4 विकसित केली आहे जी भारत सरकारने अधिसूचित देखील केली आहे.

डॉ. दिलीप कुमार श्रीवास्तव, सदस्य सचिव सह उपायुक्त, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय उपसमिती, भारत सरकार यांनी बिरसा कृषी विद्यापीठात विकसित ‘बिरसा सोयाबीन-4’ जातीची (Birsa Soybean 4) अधिसूचना जारी केली आहे. 

या नवीन सुधारित स्ट्रेनचे नेतृत्व बीएयूच्या जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. नूतन वर्मा यांनी केले आहे. नूतन वर्मा यांच्या नेतृत्वात वनस्पती पॅथॉलॉजिस्ट डॉ. नरेंद्र कुडादव डॉ. सबिता-एक्का, कीटकशास्त्रज्ञ डॉ. रवींद्र प्रसाद आणि कृषीशास्त्रज्ञ डॉ. अरबिंदो कुमार सिंग यांच्या सहकार्याने ते विकसित केले गेले आहे.

काय आहे बिरसा सोयाबीन-4 जातीची वैशिष्ट्ये

बिरसा सोयाबीन-4 जातीच्या झाडांची उंची 55 ते 60 सें.मी.  बिया लांब (अंडाकृती) आकाराच्या आणि हेलियमसारख्या हलक्या पिवळसर तपकिरी रंगाच्या असतात. ज्यामध्ये तेलाचे प्रमाण 18% आणि प्रथिने 40% असते. सोयाबीनच्या या जातीची उत्पादन क्षमता 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर असून ही जात 105-110 दिवसांत पूर्ण परिपक्व होते.

हे Rhizoctonia रोगास सहनशील आणि स्टेम फ्लाय आणि कंबरेच्या किडींना सहनशील आहे. ICAR-ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड सोयाबीन संशोधन प्रकल्पांतर्गत हे वाण विकसित करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला, सेंट्रल-व्हेरिएटल-रिलीज-समितीने बिरसा सोयाबीन-3 वाण अधिसूचित केले होते.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link