Soybean Farming: सोयाबीन शेती लाखों कमवून देणार..! फक्त पावसात सोयाबीन पिकाची 'अशी' काळजी घ्यावी लागणार, वाचा - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Soybean Farming: सोयाबीन शेती लाखों कमवून देणार..! फक्त पावसात सोयाबीन पिकाची ‘अशी’ काळजी घ्यावी लागणार, वाचा

0
Rate this post

[ad_1]

Soybean Farming: सध्या राज्यात सर्वत्र पावसाचे तांडव कायम आहे. अशा परिस्थितीत अति पावसामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची नासाडी होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने अनेक शेतकरी बांधवांच्या (Farmer) पिकांची नासाडी (Crop Damage) देखील झाली आहे. यामुळे सोयाबीन पिकाला (Soybean Crop) देखील मोठा फटका बसत असल्याचे सोयाबीन उत्पादक (Soybean Grower Farmer) स्पष्ट करत आहेत.

मित्रांना दसऱ्याच्या आपणास ठाऊकच आहे खरीप हंगामात आपल्या राज्यात सर्वाधिक सोयाबीन या नगदी पिकाची (Cash Crop) शेती केली जाते. बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हेसोयाबीन या मुख्य पिकावरच अवलंबुन असते. खरं पाहता सोयाबीन हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे.

मात्र गत उन्हाळी हंगामात आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांनी एक अनोखा प्रयोग करत उन्हाळी हंगामात सोयाबीनची यशस्वी लागवड करून दाखवली. यामुळे खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची आता उन्हाळ्यात देखील लागवड शक्‍य झाली आहे.

दरम्यान, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी तज्ज्ञांनी या पावसाच्या कालावधीत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया पावसाळ्यात सोयाबीन पिकाची काळजी कशी घ्यावी.

खरीप पिकांच्या लागवडीसाठी जुलै महिना पावसासोबतच आनंद घेऊन आला आहे, मात्र हवामान खात्याने जाहीर केलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी सावधगिरीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू कराव्यात. कारण पुढील 5 दिवस भरपूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामानावर आधारित कृषी सल्लागारानुसार शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापनाची कामे लवकरात लवकर करावी. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात पावसाचा कल स्पष्ट नसतानाच, महाराष्ट्रापासून ओरिसापर्यंत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत, उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी अगोदरच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या पिकांवर वाईट परिणाम होणार नाही.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला

सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते, त्यासाठी जून-जुलै हा काळ पेरणीसाठी योग्य असतो, परंतु यावेळी पाऊस लांबल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला उशीर केला आहे. हवामानावर आधारित कृषी सल्ल्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात केली आहे.

त्यांनी शेतातील पाणी काढण्यासाठी व्यवस्था करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या अखेरीस सोयाबीनची लागवड केली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचे पीक 10-25 दिवसांचे झाले आहे, अशा शेतकऱ्यांनी तणनियंत्रण म्हणजे निंदणी तसेच शेतातील किडी व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याचे काम सुरू ठेवावे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप सोयाबीनची पेरणी केलेली नाही, त्यांनी त्यांच्या क्षेत्रानुसार दुसरे पीक लावावे, कारण अतिवृष्टीत सोयाबीन पेरणे हा योग्य निर्णय राहणार नाही.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link