Soybean farming will make millions...! Only 'these' things have to be taken care of, 'these' diseases have to be controlled in time| सोयाबीनची शेती लखपती बनवणारचं…! फक्त 'या' गोष्टींची काळजी घ्यावी लागणार, 'या' रोगावर वेळेवर नियंत्रण मिळवावे लागणार - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Soybean farming will make millions…! Only ‘these’ things have to be taken care of, ‘these’ diseases have to be controlled in time| सोयाबीनची शेती लखपती बनवणारचं…! फक्त ‘या’ गोष्टींची काळजी घ्यावी लागणार, ‘या’ रोगावर वेळेवर नियंत्रण मिळवावे लागणार

0
Rate this post

[ad_1]

Soybean Farming: भारतात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) सुरू आहे. देशातील अनेक राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) सध्या खरीप हंगामातील पिकांचे व्यवस्थापन (Crop Management) करत असल्याचे चित्र आहे. आपल्या राज्यातही शेतकरी बांधव खरीप हंगामातील शेतीकामासाठी लगबग करत आहेत.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकरी बांधव आता पिकांची पाहणी करत असून पिकांवर आलेल्या रोगांसाठी उपाययोजना करीत आहेत. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे भारतात खरीप हंगामात सोयाबीनची लागवड (Soybean Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते.

यावर्षी देखील देशातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांनी देखील यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती (Farming) सुरू केली आहे.

खरं पाहता सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातीलचं पीक आहे, मात्र आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांनी गेल्या उन्हाळ्यात सोयाबीनची लागवड करून दाखवली. विशेष म्हणजे उन्हाळ्यात लावलेल्या सोयाबीन पिकातून अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी (Soybean Grower Farmer) चांगले दर्जेदार उत्पादन देखील मिळवले.

शिवाय गत हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी चांगला बाजारभाव मिळाला असल्याने या हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसात अति-मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले होते.

त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून अनेक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांवर रोगांचे देखील सावट यामुळे बघायला मिळत आहे. सोयाबीन या खरिपातील मुख्य पिकावर देखील रोगाचे सावट या वेळी आहे. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीन या खरिपातील मुख्य पिकावर येणाऱ्या काही रोगांची आणि त्याच्या वर केल्या जाणाऱ्या उपाययोजनेची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

सोयाबीन पिकावरील कीड व रोगांचे प्रतिबंध

शेतकरी बांधवांनी सोयाबीनच्या लागवडीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, कारण त्याच्या पिकामध्ये सर्वात जास्त आणि घातक कीटक असतात. जे पीक तयार होण्यापूर्वीचं मोठ्या प्रमाणात खराब करतात. खरं पाहिल्यास सोयाबीनच्या लागवडीमध्ये दोन प्रकारचे रोग सर्वाधिक दिसून येतात.

लीफ स्पॉट रोग

या प्रकारच्या रोगामुळे पिकाच्या पानांवर आणि देठावर हलके लाल आणि तपकिरी ठिपके दिसतात, ज्यामुळे पाने अकाली तुटतात. याला प्रतिबंध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीच्या 30 दिवसांनी त्यांच्या शेतात कार्बेन्डाझिम किंवा थायोफेनेट मिथाइल 0.05% द्रावणाची फवारणी करावी आणि त्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा संपूर्ण शेतात फवारणी करावी.

पिवळा मोज़ेक रोग

पिवळा मोझॅक रोग हा एक प्रकारचा विषाणूजन्य रोग आहे, जो पिकामध्ये खूप वेगाने पसरतो. या रोगात माशी देठावर अंडी घालून सुरवंट बनवते. जे पिकाचे झायलेम आतून पूर्णपणे नष्ट करते. त्यामुळे पीक पिवळे पडू लागते. त्याचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपल्या शेताची पाहणी करत राहावे. जेणेकरून अशी एखादी वनस्पती दिसली की लगेच उपटून गाडून टाकावी. याशिवाय पिकामध्ये इमिडाक्लोप्रिड, लॅम्बडा सायहॅलोथ्रीनची फवारणी करत रहा.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link