Soybean First Spray: सोयाबीन पेरणी केल्यानंतर 'या' औषधाची पहिली फवारणी करा, लाखोंचे उत्पन्न मिळणार । सोयाबीन पहिली फवारणी कोणती करावी - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Soybean First Spray: सोयाबीन पेरणी केल्यानंतर ‘या’ औषधाची पहिली फवारणी करा, लाखोंचे उत्पन्न मिळणार । सोयाबीन पहिली फवारणी कोणती करावी

0
4.5/5 - (2 votes)

Soybean Farming: मित्रांनो सध्या देशात खरीप हंगाम (Kharif Season) सुरू आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) हंगामातील पिकांची पेरणी साठी धावपळ करत असल्याचे चित्र आहे.

आपल्या राज्यात देखील शेतकरी बांधव खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन, कापूस, मका तसेच कोरडवाहू भागात बाजरी या पिकाची शेती करण्यासाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो खरीप हंगामातील मुख्य पीक अर्थात सोयाबीनचे (Soybean Crop) राज्यातील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.

राज्यात सोयाबीनची शेती (Soybean Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते आणि साऊंड शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या पिकावरच अवलंबुन असते. मित्रांना जस की आपणास ठाऊकच आहे सोयाबीन हे प्रमुख तेलबिया पीक आहे.

यामुळे सोयाबीनला बाजारात कायमचं मागणी असते आणि सोयाबीनला बाजारात चांगला बाजार भाव (Soybean Rate) देखील मिळतो. गत वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात किंचित वाढ होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी सोयाबीन पेरणी नंतर पहिली फवारणी कोणत्या औषधाची करावी या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर सांगणार आहोत. 

कृषी तज्ञांच्या मते, सोयाबीन पेरणी केल्यानंतरचा पहिला महिना हा अतिशय महत्त्वाचा असतो. तज्ञांच्या मते या पहिल्या महिन्यात सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या एक महिन्याच्या कालावधीत चक्रीभुंगा आणि खोडकिडा या दोन कीडी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात.

या दोन्ही किडी अतिशय हानिकारक असून यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात निम्म्याने घट होऊ शकते. यामुळे या दोन्ही किडींचा वेळेत बंदोबस्त करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, या किडीच्या जास्त प्रादुर्भावामुळे 40 टक्‍क्‍यांपर्यंत सोयाबीनचे उत्पादन कमी होते.

अशा परिस्थितीत या किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी ताबडतोब उपाय योजना करणे अतिशय महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत आज आपण या दोन किटकांचा बंदोबस्त कसा करायचा त्यासाठी कोणती फवारणी करावी लागेल याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

*क्लोरोपायरीफाँस + सायपरमेथ्रीन 50 % EC प्रमाण 25 ml ( प्रती पंप )

*सिजेन्ता चे अलीका (Thaimethoxam 12.6% lamda cyhalothrin 9.5%) याचे प्रमाण  10 ते 12 ml( प्रती पंप)

*ईमामेक्टीन बेन्झोईट 5% (Emamectin Benzoate 5%sg) प्रमाण 10 gm.( प्रती पंप)

मित्रांनो वर दिलेल्या कोणत्याही एका औषधाची फवारणी केली जाऊ शकते. मात्र आम्ही इथे दिलेली माहिती ही अंतिम नसून यासाठी कृषी वैज्ञानिकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालकाचा सल्ला अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे कोणतीही फवारणी करण्याआधी कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा तसेच कृषी वैज्ञानिकांचा सल्ला किंवा कृषी विभागाचा सल्ला आपल्यासाठी सर्वपरी राहणार आहे, याची नोंद घ्यावी.

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link