Soybean Market Price: 'या' बाजारसमितीत मिळाला सोयाबीनला सर्वाधिक बाजारभाव, विक्रीला जाण्याआधी एकदा वाचा - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Soybean Market Price: ‘या’ बाजारसमितीत मिळाला सोयाबीनला सर्वाधिक बाजारभाव, विक्रीला जाण्याआधी एकदा वाचा

0
Rate this post

[ad_1]

Soybean Market Price: मित्रांनो भारतात सोयाबीनची (soybean crop) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आपल्या राज्यात देखील सोयाबीनची लागवड (soybean farming)  विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव सोयाबीनची शेती करत असतात.

सोयाबीन लागवड शेतकरी बांधवांसाठी (farmer) फायदेशीर ठरत असल्याने अलीकडील काही काळात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पाहता या वर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात किंचित का होईना वाढ झाली असावी कारण की गतवर्षी सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजारभाव (soybean rate) मिळाला होता. मित्रांनो अशा परिस्थितीत राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या बाजार भावाकडे मोठे बारीक लक्ष असते.

अशा परिस्थितीत आम्ही देखील शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच सोयाबीनचे बाजार भावाची माहिती घेऊन येत असतो. मित्रांनो आज रविवार असल्याने राज्यातील जवळपास सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार बंद होता. मात्र महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावाची माहिती दिली गेली आहे. उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 665 क्विंटल आवक झाल्याचे महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाच्या वेबसाईटवर नमूद आहे.

तसेच आज उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन ला कमीत कमी सहा हजार 350 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये सोयाबीनला सहा हजार 431 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला आहे. या एपीएमसी मध्ये सोयाबीनला सहा हजार 390 रुपये प्रति क्विंटल एवढा ऍव्हरेज बाजार भाव मिळाला आहे.

काल 13 ऑगस्ट 2022 रोजी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक बाजार भाव मिळाला होता. या एपीएमसीमध्ये 13 ऑगस्ट रोजी सोयाबीनला सहा हजार 472 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला होता.या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी सहा हजार 280रुपये एवढा बाजार भाव मिळाला. तर सर्वसाधारण बाजार भाव सहा हजार चारशे एवढा राहिला. बाजार समितीत काल सहा हजार 193 क्विंटल एवढे सोयाबीनची आवक नमूद करण्यात आली होती. 

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link