Soybean Market Price: सोयाबीनचे 11 तारखेचे ताजे बाजारभाव जाणून घ्या, मगच विक्रीचे नियोजन आखा - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Soybean Market Price: सोयाबीनचे 11 तारखेचे ताजे बाजारभाव जाणून घ्या, मगच विक्रीचे नियोजन आखा

0
Rate this post

[ad_1]

Soybean Market Price: भारतात खूप मोठ्या प्रमाणात तेलबिया पिकांची (Oilseed Crop) शेती (Farming) केली जाते. तेलबिया पिकाच्या एकूण उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा (Maharashtra Soybean Farming) मोठा सिंहाचा वाटा आहे. सोयाबीन (Soybean Crop) हे देखील एक प्रमुख तेलबिया पीक आहे. सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.

संपूर्ण देशात मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते मध्यप्रदेश पाठोपाठ आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतो. यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या शिरेपेचात एक मानाचा तुरा सोयाबीन उत्पादनामुळे रोवला गेला आहे. मित्रांनो सोयाबीनचे आपल्या राज्यात अमाप उत्पादन होत असल्याने राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे सोयाबीन या मुख्य आणि नगदी पिकावर (Cash Crops) अवलंबून आहे.

अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव सोयाबीनच्या बाजारभावाकडे (Soybean Rate) बारीक लक्ष लावून असतात. त्यामुळे आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी विशेषता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे ताजे बाजार भाव व कोणत्या एपीएमसीमध्ये किती आवक झाली, जास्तीत जास्त बाजार भाव काय मिळाला, कमीत कमी बाजार भाव काय मिळाला तसेच सर्वसाधारण बाजार भाव काय मिळाला याविषयी रोजच माहिती घेऊन हजर होत असतो. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता 11 ऑगस्ट 2022 चे सोयाबीनचे बाजार भाव जाणून घेऊया.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती:- मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील एक प्रमुख बाजारपेठ आणि कांदा साठी संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेली बाजारपेठ अर्थातच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 11 ऑगस्ट 2022 रोजी सोयाबीनची 65 क्विंटल एवढी आवक नमूद करण्यात आली आहे. आज लासलगाव एपीएमसी मध्ये सोयाबीनला कमाल दर 6161 रुपये प्रति क्विंटल मिळाला तसेच किमान दर 5401 एवढा मिळाला तसेच सर्वसाधारण दर 6161 प्रती क्विंटल होता.

मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज मोर्शी मध्ये 104 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली असून आज या एपीएमसीमध्ये सोयाबीन ला जास्तीत जास्त 6 हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला, तर कमीत कमी दर 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनचा सर्वसाधारण दर 5825 प्रति क्विंटल एवढा राहिला.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- विदर्भातील नागपूर एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 200 क्विंटल एवढी आवक झाली असून आज या एपीएमसीत सोयाबीनला जास्तीत जास्त 6 हजार 100 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला, तर कमीत कमी 5 हजार 250 एवढा दर राहिला. तसेच आज सर्वसाधारण दर 5,888 प्रति क्विंटल एवढा होता.

ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती:- ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोयाबीनची 60 क्विंटल एवढी आवक झाली असून आज या बाजार समितीत सोयाबीनला जास्तीत जास्त 6 हजार 400 रुपये एवढा दर मिळाला. तर कमीत कमी 6 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर होता आणि सर्वसाधारण दर आज 6 हजार 200 प्रति क्विंटल एवढा राहिला.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती:- मराठवाड्यातील सोयाबीन साठी एक प्रमुख बाजार समिती म्हणून ओळखले जाणारे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोयाबीनची 800 सहा क्विंटल एवढे आवक झाली. आज बाजार समितीत सोयाबीनला जास्तीत जास्त 6,470 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. आज सोयाबीनला कमीत कमी 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव होता, तर सर्वसाधारण बाजार भाव 6 हजार 195 रुपये प्रति क्विंटल एवढा होता.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती:- यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 78 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त 6 हजार 380 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. कमीत कमी बाजार भाव पाच हजार 900 तर सर्वसाधारण दर 6,140 एवढा राहिला.

उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची 70 क्विंटल एवढे आवक झाली होती. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त 5,900 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला तर कमीतकमी बाजार भाव 5 हजार 700 एवढा राहिला आणि सर्वसाधारण दर 5 हजार 800 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link