Soybean MSP Rates 2022: केंद्र सरकारने तीळाच्या हमीभावात (Sesame MSP) सर्वाधिक वाढ केली. सोयाबीनला (Soybean MSP) ३५० रुपयांची वाढ मिळाली. तर कापसाला लांब धाग्यासाठी (Cotton MSP ) ३५५ रुपये आणि मध्यम धाग्यासाठी ३५४ रुपये वाढविण्यात आले. केंद्राने यंदा सोयाबीनसह इतरही तेलबिया पिकांच्या (Oilseed Crop MSP) हमीभावात गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक वाढ केल्याचे दिसते.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकित बुधवारी (ता.८) खरिप हंगाम २०२२-२३ साठी १४ पिकांच्या हमीभाव वाढीला मंजुरी देण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात अधिक वाढ केली. या १४ पिकांमध्ये तिळासाठी सर्वाधिक ५२३ रुपये वाढ करण्यात आली. २०२१-२२ च्या हंगामात सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपये वाढ केली होती. मात्र यंदा ३५० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळं सोयाबीनचा हमीभाव ३९५० रुपयांनी ४३०० रुपये झाला. तर मध्यम धागा कापसाच्या हमीभावात ३५४ रुपयांची वाढ करून ६०८० रुपये करण्यात आला. तर लांब धागा कापसासाठी ३५५ रुपयांची वाढ देऊन ६३८० रुपये हमीभाव जाहिर केला.
मुगाच्या हमीभावात ४८० रुपये वाढ केली. मुगाचा हमीभाव आता ७२७५ रुपयांवरून ७७५५ रुपयांवर पोचला. तर तुरीच्या हमीभावात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ३०० रुपयांची वाढ करण्यात आली. हंगामात तुरीला आता ६६०० रुपये हमीभाव जाहिर झाला. या पिकांमध्ये मक्याला सर्वांत कमी ९२ रुपये वाढ मिळाली. मक्याचा हमीभाव १८७० रुपयांवरून १९६२ रुपये करण्यात आला.
Soybean MSP Rates 2022
भूईमुगालाही ३०० रुपयांची वाढ मिळाली. खरिपात आता भुईमुगाला ५८५० रुपये हमीभाव मिळेल. मागील हंगामात २७५ रुपये वाढ मिळाली होती. तर सूर्यफुलाचा हमीभावही ३८५ रुपयांनी वाढविण्यात आला. आता सूर्यफुलाला ६४०० रुपयांचा हमीभाव जाहिर झाला. मागील हंगामात सूर्यफुलाला केवळ १३० रुपयांची वाढ मिळाली होती.
तेलबियांसाठी चांगली वाढ
केंद्र सरकारने खरिप हंगाम २०२२-२३ मध्ये तेलबिया पिकांच्या हमीभावात चांगली वाढली. तीळाच्या हमीभावात सर्वाधिक ५२३ रुपये वाढ झाली. तर सोयाबीन ३५० रुपये, सूर्यफुल ३८५ रुपये आणि भुईमुगाला ३०० रुपये वाढ मिळाली.
हे पण वाचा –
- 5 techniques to place popular online dating sites Scams (And 9 reliable internet sites)
- Leading 12 greatest army online dating sites in 2019
- Tips Bounce Straight Back After a primary Date Screw-Up
- Meilleur gratuit Lignes de chat pour des rencontres en 2021
- Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल “इतके रुपये” स्वस्त! तात्काळ आपल्या गाडीची टाकी फुल करा
- Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल “इतके रुपये” स्वस्त! तात्काळ आपल्या गाडीची टाकी फुल करा
- PMAY 22-23 | घरकुल योजनेचे 1 लाख रुपये अनुदान असे होणार वितरित
- Shetakari KarjMafi Maharashtra | मराठवाडा विदर्भातील या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी
- Karjmafi Maharashtra | आता या कर्जदारांना मिळणार शासनाचा दिलासा
- Ativrushti Nuksan Bharpai 2022 | राज्यातील १० जिल्ह्याना अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर ! पहा तुमचा जिल्हा आहे का
- Cabinet Meeting | शेतकरी, स्वातंत्र्यसैनिक, बेरोजगारांना दिलासा.! मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15 महत्त्वाचे निर्णय
- LPG GAS : आता घरगुती गॅस सिलेंडर वर “QR CODE” बसवणार,जाणून घ्या फायदे आणि कस काम करणार