[ad_1]
पुणेः आंतरराष्ट्रीय बाजार सोयाबीन दर तेजीत असल्याने चीनमधील आयात थांबली. त्यामुळे येथील प्रक्रिया उद्योगाला सोयाबीनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे उद्योगांनी एक ते तीन महिने गाळप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारकडील साठा बाजारात केव्हा येतो, याकडे चीन उद्योगाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा – ब्राझीलसोबतचे सोयाबीन करार चीनकडून रद्द
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर (International Soybean Market Rate) तेजीत आहेत. ब्राझील चीनचा सर्वांत मोठा सोयाबीन पुरवठादार देश आहे. मात्र येथे यंदा उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये सोयाबीनचे दर (Brazil Soybean Market Rate) मोठ्या प्रमाणात वाढले. याचा लाभ अमेरिकेतील बाजारालाही होत आहे. मात्र ब्राझीलमधील शेतकरीच वाढीव दराने सोयाबीनचे दरार करत आहेत. त्यामुळे वाहतुकीसह, विमा आणि इतर खर्चासह सोयाबीन आयात (Soybean Import) अतिशय महागडी होत आहे. परिणामी आयातदारांना नफा मिळत नाही. तसेच चीनमधील सोयाबीन गाळप मार्जिन कमी झाले किंवा तोट्यात जात आहे. त्यामुळे चीनी आयातदारांना ब्राझीलसोबतचे आयात करार रद्द केले आहेत. याचा थेट परिणाम चीनमधील सोयाबीन उपलब्धतेवर होत आहे. येथील सोयाबीन गाळप आणि तेल प्रक्रिया प्लांट्सना तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे चीनमधील उत्तर आणि दक्षिण भागातील काही गाळप प्लांट्स बंद पडले आहेत किंवा पडण्याच्या मार्गावर आहेत.
हे ही वाचा – देशातून तेलबिया पेंड निर्यातीत मोठी घट
चीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुंगे भागातील तियाजीन येथील सोयाबीन गाळप प्लांट्सनी ९० दिवसांसाठी गाळप बंद ठेवले आहे. येथील उद्योगाने १४ फेब्रुवारी ते २ एप्रिल या काळात प्रक्रिया थांबविली आहे. तर नानजिंग येथील कंपन्यांच्या प्लांट्सना फेब्रुवारीच्या शेवटीपासून मार्चपर्यंत एक महिन्यात गाळप बंद ठेवण्यास सांगितले आहे. तसेच येथील अनॅलिटीकल संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या दक्षिण भागातील सोयाबीन प्रक्रिया उद्योगाने मार्च महिन्यात काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझील, अर्जेंटीना, पेरुग्वे आणि उरुग्वे या देशांमध्ये सोयाबीन उत्पादन घटण्याचे अंदाज आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या वायदे बाजाराच मोठी तेजी आला. परिणामी चीनच्या आयातदारांना मोठा फटका बसला. आयात खर्च वाढल्याने त्यांनी सोयाबीनचे करार रद्द केले आहेत.
व्हिडीओ पाहा –
सोयाबीनची मागणी मुख्यत्वे सोयापेंडसाठी (Soymeal) असते. मात्र डिसेंबरच्या मध्यापासून सोयापेंडचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळेही प्रक्रिया उद्योगाच्या अडचणींत वाढ झाली. त्यामुळे चालू हंगामातील सोयाबीन खरेदी थांबविली असून पुढील हंगामातील करार करणे सुरु केले आहेत. परिणामी सध्या चीनमधील प्रक्रिया उद्योगाकडे कमी सोयाबीनचा साठा शिल्लक आहे.
चीनमधील सोयाबीनचा साठा
चीनच्या ग्रेन्स अॅन्ड ऑईल इन्फाॅर्मेशन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, चीनधील सोयाबीनचा साठा मागील आठवड्यापर्यंत ३९.५ लाख टनांवर आला होता. हा साठा २०२१ मध्ये याच काळातील उपलब्ध सोयाबीनच्या तुलनेत १५ लाख टनांनी कमी आहे. ग्वांगझी प्रांतातील केवळ दोन प्रक्रिया प्लांट्सकडे सध्या सोयाबीनचा साठा शिल्लक आहे. इतर प्लांट्सची गोदामे खाली आहेत.
चीन सकारच्या साठ्याकडे उद्योगाचे लक्ष
बाजारातून सोयाबीन खरेदी करणे अशक्य होत असल्याने आता चीनी सरकारच्या साठ्याकडे लक्ष लागले आहे. येथील उद्योग आणि बाजारही सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून आहे. चीनी सरकारने साठ्यातील सोयाबीन बाहेर काढल्यास उद्योगांना दिलासा मिळू शकतो, असे येथील जाणकारांनी सांगितले. चीनी सरकार मार्च आणि मे महिन्यात ५० लाख टन सोयाबीन बाजारात आणू शकते, अशी चर्चाही येथे सुरु आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.