[ad_1]
पुणेः ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन घटीचा अंदाज आला. तसेच अर्जेंटीनाने सोयातेल आणि सोयापेंड निर्यातीचे करार थांबविले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर (Soybean price) सुधारले. यासोबतच सोयातेल (Soy oil) आणि सोयापेंडचेही (Soymeal) दर वाढले.
जागतिक बाजारात सतत उलाढाल होतेय. शेतीमालासाठी महत्वाच्या देशांनी एखादा निर्णय घेतला की लगेच बाजारात पडसाद उमटतात. इंडोनेशियाने ५० टक्के पामतेल देशात वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पामतेलाचे दर वाढले. तर ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन (Brazil Soybean) गेल्यावर्षीच्या तुलनेत १५३ लाख टनांनी घटण्याचा अंदाज आला. तसेच अर्जेंटीनाने सोयातेल आणि सोयापेंड निर्यातीसाठीची नोंदणी थांबविली. यामुळे आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजाराला (Soybean market) संजिवनी मिळाली. अर्जेंटीनाने सूर्यफूल तेल निर्यात आधीच बंद केली. त्यामुळे जागतिक खाद्यतेल बाजारातील स्थिती अनिश्चित होत चालली आहे. अनेक देश अत्यावश्यक मालाचा साठा करत आहेत. त्यात खाद्यतेलाचे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे खाद्यतेलांच्या दरात सर्वाधिक वाढ झाली.
हे ही वाचाः सोयाबीन दर सुधारण्याचा अंदाज
अर्जेंटीनात चालू हंगामातील पीक बाजारात यायचे आहे. परंतु त्याआधीच अर्जेंटीना सरकारने सोयातेल आणि सोयापेंड निर्यातीचे करार थांबविले. अर्जेंटीना सरकारने रविवारी हा निर्णय जाहिर केल्यानंतर सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात याचे पडसाद उमटले. सीबाॅटवर सोयापेंडचे वायदे २.२ टक्क्यांनी सुधारले होते. तर सोयातेलाचे वायदे सव्वाटक्क्यांनी वाढले. २०२१ मध्ये अर्जेंटीनाची महिन्याला सरासरी सोयापेंड निर्यात १५ लाख टन आणि सोयातेल निर्यात तीन लाख टनांवर होती. तर चालू हंगामात जागतिक सोयापेंड निर्यातीत अर्जेंटीनाचा वाटा ४१ टक्के आणि सोयातेलात ४८ टक्के वाटा राहण्याचा अंदाज आहे. अर्जेंटीनाने निर्यात सौदे थांबविल्याने खरेदीदार अमेरिका आणि ब्राझीलकडे वळण्याची शक्यता आहे. परंतु अमेरिकेच्या बाजारात आधीच सोयाबीन तेजीत आहे.
सीबाॅटवर सोमवारी सोयाबीनचे मार्चचे वायदे १७०५ सेंट प्रतिबुशेल्सने झाले. सोयापेंडचे वायदे ५०५.९० डाॅलर प्रतिटनाने पार पडले तर सोयतेलाचे व्यवहार ८१.७८ सेंट प्रतिपाऊंडने झाले. मे महिन्यातील सोयाबीनचे वायदे १६७६ सेंटवर बंद झाले. सोयापेंडचे व्यवहार ४८३.८० डाॅलरने झाले. तर सोयातेलाला ७४.९६ सेंटचा दर मिळाला.
हे ही वाचाः अर्जेंटीनाच्या सुर्यफूल तेलाच्या किमतीत ४७ टक्क्यांनी वाढ
देशातही सोयाबीनला ६ हजार ९०० ते ७ हजार ६०० रुपये दर मिळाला. तर प्लांट्सचे दर ७ हजार ५०० ते ७ हजार ८०० रुपये होते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सोयाबीन आवक ३० ते ४० हजार क्विंटल च्या दरम्यान असल्याचे जाणकारांनी सांगितले. तर राजस्थानमध्ये केवळ ५ ते ६ हजार क्विंटल सोयाबीन बाजारात आले.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.