[ad_1]
पुणेः यंदा देशातून सोयापेंड (Soymeal) निर्यात घटली, असं सोपानं स्पष्ट केलंय. मात्र खाद्यतेल (Edible oil) दरवाढीमुळे सोयाबीन एक भावपातळीभोवती फिरत आहे. आजही देशातील बाजारात सोयाबीन (Soybean) तेजीत होते. मंगळवारी देशात सोयाबीनला ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये दर मिळला.
सोयाबीन हंगाम ऑक्टोबरपासून सुरु झाला. हंगाम सुरु होऊन पाच महिने झाले. मात्र बाजारातील सोयाबीन आवक (Soybean Arrival) कमीच आहे, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने अर्थात सोपाने (SOPA) म्हटले आहे. सोपाच्या मते फेब्रुवारीपर्यंत देशातील बाजारांत ५५ लाख टन सोयाबीन बाजारात आले. मागील हंगामात याच काळात ७० लाख टन सोयाबीन विक्री झाली होती. बाजारात आवक कमी झाल्याने गाळपही घटले. यंदा सोयाबीन गाळप ३७ टक्क्यांनी कमी झाले. मागील हंगामात याच काळात ५४ लाख टनांचे गाळप झाले होते. मात्र यंदा केवळ ३४ लाख टन सोयाबीनवर प्रक्रिया झाली.
हे ही वाचाः खाद्याच्या दरवाढीमुळे पोल्ट्री उद्योग मेटाकुटीला
सोयापेंडची निर्मितीही हंगामाच्या अगदी सुरुवातीपासूनच कमी राहिली. आत्तापर्यंत २७ लाख टन सोयापेंडेची देशात निर्मिती झाली. मागील हंगामाच्या तुलनेत सोयापेंड निर्मिती ३७ टक्क्यांनी कमी राहिली. मागील वर्षी पहिल्या पाच महिन्यांत ४३ लाख टन सोयापेंड उत्पादन झालं होतं. सोयापेंड निर्मितीत मात्र यंदा ६९ टक्क्यांनी घट झाली. मागील हंगामात १३.५५ लाख टन सोयापेंड निर्यात झाली होती. मात्र यंदा केवळ ४.२३ लाख टन सोयापेंड विदेशात गेली.
यंदा सोयापेंड निर्यात घटली मात्र मानवी आहारात सोयाबीनचा वापर वाढला. मानवी आहारातील सोयाबीन वापर ३५ टक्क्यांनी वाढला. तसेच सोयातेलासाठी सोयाबीनला मागणी वाढली आहे. याचा परिणाम दरावर झाला. सध्या दर एका भावपातळीभोवती फिरत आहेत. मंगळवारी देशात सोयाबीनला ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये दर मिळला.
हे ही वाचाः अर्जेंटीनाच्या सुर्यफूल तेलाच्या किमतीत ४७ टक्क्यांनी वाढ
मध्य प्रदेशचा विचार करता सोयाबीन आवक ३० हजार क्विंटल होती. या सोयाबीनला सर्वसाधारण दर ७ हजार ३०० रुपये राहिला. तर प्लांट्सचे दर सरासरी ७ हजार ५५० रुपये होते. महाराष्ट्रातही सोयाबीनची आवक जवळपास ३० हजार क्विंटल राहिली. तर बाजार समितीत सर्वसाधरण दर ७ हजार रुपयांचा होता. कमाल दर ७ हजार ५०० रुपये मिळाला. तर प्लांट्सचा दर सरासरी ७ हजार ४०० रुपये राहिला.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.