मुलीच्या जन्मानंतर मिळणार 50 हजार रुपये, राज्य सरकारची भन्नाट योजना..! - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

मुलीच्या जन्मानंतर मिळणार 50 हजार रुपये, राज्य सरकारची भन्नाट योजना..!

0
5/5 - (3 votes)

स्री-शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवत असतात.. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी एक योजना सुरु केली.. ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ (Government scheme) असं या योजनेचं नाव..

पहिल्या मुलीच्या जन्मानंतर जे पालक 1 वर्षाच्या आत नसबंदी करतात, त्या मुलीच्या नावावर राज्य सरकारकडून 50,000 रुपये जमा केले जातात. तसेच, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन केल्यास दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी 25000-25000 रुपये बँकेत जमा केले जातात.

महाराष्ट्रातील एकाच व्यक्तीच्या दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळतो.. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षात आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्यांत पालकाने नसबंदी करणं बंधनकारक आहे.

पूर्वी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबच (BPL – वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत) या योजनेसाठी पात्र होते. नव्या नियमानुसार, वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये केली आहे. महाराष्ट्रातील ज्यांचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये आहे, असे कोणतेही कुटुंब या योजनेचा लाभ आता घेऊ शकतात.

असा मिळतो लाभ..
– ‘माझी कन्या भाग्यश्री योजने’चा लाभ घेण्यासाठी पात्र पालकांना अर्ज करावा लागतो. योजने अंतर्गत मुलीच्या नावे किंवा तिच्या आईच्या नावाने बँक खाते उघडले जाते. या खात्यातच राज्य सरकार वेळोवेळी पैसे पाठवते.
– मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला पूर्ण रक्कम काढता येते. अर्थात या रकमेवर मुलीला व्याजाचे पैसे मिळत नाहीत.

– भाग्यश्री योजनेचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुलगी किमान दहावी उत्तीर्ण, तसेच अविवाहित असायला हवी.
– एका कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच योजनेचा लाभ मिळतो.

– लाभार्थी मुलगी व तिच्या आईच्या नावाने नॅशनल बँकेत संयुक्त खाते उघडले जाते.. दोघांना एक लाखांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ‘ओव्हर ड्राफ्ट’ मिळतो.
– योजनेंतर्गत मिळालेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.

योजनेसाठी पात्रता
– अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
– दोन मुलींनंतर नसबंदी करणाऱ्या पालकालाच ‘माझी कन्या भाग्यश्री योजने’चा लाभ मिळतो. तिसरे अपत्य जन्मल्यास आधीच्या दोन्ही मुलींनाही योजनेचा लाभ मिळू शकत नाही.

आवश्यक कागदपत्रे
– अर्जदाराचे आधार कार्ड
– आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
– मोबाईल नंबर

– पासपोर्ट आकाराचा फोटो
– पत्त्याचा पुरावा
– उत्पन्नाचा दाखला

असा करा अर्ज
राज्यातील पात्र पालकाने महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तेथून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा. अर्जात विचारलेली सगळी माहिती भरुन, वरील कागदपत्रे फॉर्मसोबत जोडावीत. नंतर हा अर्ज जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जमा करावा…


Share via
Copy link