Strawberry Farming: स्ट्रॉबेरी शेतीतून लाखोंची कमाई करायची ना ! मग ऑगस्टमध्ये ‘या’ जातीची लागवड करा, लाखों कमवा - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Strawberry Farming: स्ट्रॉबेरी शेतीतून लाखोंची कमाई करायची ना ! मग ऑगस्टमध्ये ‘या’ जातीची लागवड करा, लाखों कमवा

0
Rate this post

[ad_1]

Strawberry Farming: गेल्या काही वर्षांत स्ट्रॉबेरीच्या लागवडीचा (Strawberry Cultivation) देशात सातत्याने विस्तार होत आहे. पूर्वी या पिकाची फक्त थंड प्रदेशात लागवड केली जायची पण आता उष्ण प्रदेशातही त्याची लागवड केली जात आहे. यासाठी शेतकरी (Farmer) शेतात रोपांसाठी (Strawberry Crop) पोषक वातावरण ठेवतात.

त्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला नफा (Farmer Income) मिळत आहे. परंतु अलीकडेच दोन तीन वर्षांपूर्वी भारतात स्ट्रॉबेरीची एक नवीन जात (Strawberry Variety) आली आहे जी इतर जातींच्या तुलनेत शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत असल्याचा दावा केला जात आहे. ‘अकिहिमे’ असे या जातीचे नाव आहे.

स्ट्रॉबेरीची लागवड करणारा कोणताही शेतकरी हिमाचल प्रदेशातून त्याचे रोपटे घेतो. या ठिकाणी आता स्ट्रॉबेरीची नवीन जात अकिहिमेची लागवड बघायला मिळतं आहे. असे सांगितले जात आहे की, हिमाचल प्रदेश मधील शेतकऱ्यांनी  दक्षिण कोरिया येथून या जातीची आयात केली आहे. 

भारतात पहिल्यांदाच या जातीची लागवड हिमाचल प्रदेश मध्येच केली असल्याचे सांगितले जात आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे त्याची फळे टणक असतात त्यामुळे ते लवकर खराब होत नाही. इतर जातींची पिके खूप मऊ असल्यामुळे ती लवकर खराब होतात. अकिहिमे जातीच्या स्ट्रॉबेरीची अजून एक विशेषता म्हणजे या जातींचे फळ 22 ते 40 ग्रॅम पर्यंत असते, तर इतर जातींचे फळ फक्त 15 ते 30 ग्रॅम पर्यंत असते.

मित्रांनो आम्ही इथे नमूद करू इच्छितो की, स्ट्रॉबेरीची रोपे मैदानी भागात ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये लावली जातात. एका एकरात 32 हजार स्ट्रॉबेरीची रोपे लावली आहेत. दुसर्‍या जातीची एक वनस्पती 400 ते 600 ग्रॅम स्ट्रॉबेरी तयार करते, तर या अकिहिमे जातीची एक वनस्पती 800 ते 900 ग्रॅम स्ट्रॉबेरी तयार करते. निश्चितच स्ट्रॉबेरीची ही नवीन जात शेतकरी बांधवांना दुपटीने नफा मिळवून देणार आहे. शेतकरी बांधवांनी ऑगस्टमध्ये या जातीची लागवड केल्यास शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.

मित्रांनो कोणत्याही पिकाच्या कोणत्याही जातीची निवड करण्याआधी आपल्या हवामानाचा, आपल्या जमिनीचा विचार करणे अतिशय महत्त्वाचे राहणार आहे. यामुळे कोणत्याही पिकाच्या कोणत्याही वाणाची लागवड करण्याआधी कृषी तज्ञांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link