Success Story| मानलं ताई तुम्हाला..! या महिलेने शेतीत केला हा बदल, अन आता वर्षाकाठी कमवतेय 7 लाखांचं उत्पन्न - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Success Story| मानलं ताई तुम्हाला..! या महिलेने शेतीत केला हा बदल, अन आता वर्षाकाठी कमवतेय 7 लाखांचं उत्पन्न

0
Rate this post

[ad_1]

Success Story: खरं पाहता शेती (Agriculture) हा एक बारामाही चालणारा व्यवसाय आहे. अशा परिस्थितीत शेतीकडे व्यवसायाच्या (Business) दृष्टीकोनातून पाहणे आता अत्यावश्यक बनले आहे. इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणे शेतीमध्ये देखील काळाच्या ओघात बदल घडवून आणणे अतिशय आवश्यक आहे.

ज्या पद्धतीने व्यवसायात मागणीनुसार पुरवठा केला जातो अगदी त्याच पद्धतीने शेतीमध्ये देखील शेतकरी बांधवांनी मागणीनुसार पिकांची शेती करणे आता अतिशय आवश्यक बनले आहे. बाजारात मागणी मध्ये असलेल्या पिकांची शेती करणे हा शेतीमधला यशाचा मंत्र बनला आहे. शेतीमध्ये शेतकरी बांधवांनी (Farmer) आधुनिक यंत्रांचा वापर करत शेती करणे आवश्यक बनले आहे.

पंजाबच्या अंबाला मधील एका महिलेने (Women Farmer) देखील शेतीमधील ही बाब हेरून घेतली आहे. त्यामुळे अंबालाच्या या महिलेला शेतीतून लाखो रुपयांची कमाई होत आहे. 32 वर्षीय अमरजीत यांनी शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर करत लाखोंची कमाई (Farmer Income) केली आहे. या प्रयोगशील महिला शेतकऱ्याचा शेतात आधुनिक शेतीची सर्व उपकरणे आहेत. ती अद्ययावत तंत्रज्ञानाविषयी अद्ययावत राहते तसेच त्यांची अंमलबजावणी करते, म्हणूनच ती तिच्या क्षेत्रातील यशस्वी महिला शेतकऱ्यांपैकी एक आहे.

कोण आहे ही महिला शेतकरी 

पंजाबमधील अंबाला जिल्ह्यातील अधोई गावातील प्रगतीशील महिला शेतकरी अमरजीत 13 वर्षांहून अधिक काळ झाला शेती करत आहे. हाच त्याच्या कुटुंबाचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे. अमरजीत आधी वडिलांच्या शेतात अर्धवेळ काम करायची, पण 2007 मध्ये वडिलांना अर्धांगवायू झाल्यामुळे अमरजीतने शेतीची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. ही जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली आहे आणि आजच्या घडीला शेतीतून लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.

अमरजीतकडे 8.5 एकर बागायत जमीन आणि एक लहान डेअरी युनिट आहे, ज्यामध्ये 2 म्हशी आहेत. त्यांच्या शेतात सबमर्सिबल ट्यूबवेल, ट्रॅक्टर, एम.बी. नांगर, डिस्क हॅरो, हॅपी सीडर, डीएसआर अशी अनेक आधुनिक शेती अवजारे आहेत.

शेतीमध्ये केलेत हे बदल

या प्रयोगशील महिला शेतकऱ्याने तीन पीक पद्धतीचे अनुसरण करण्यास सुरवात केली आहे. पहिला तांदूळ-गहू-मुग, दुसरा ऊस-कांदा-लसूण आणि तिसरा बटाटा-कांदा-चारा. तज्ज्ञांच्या तांत्रिक सल्ल्याच्या मदतीने ती गहू, हरभरा, मूग आणि मोहरी या पिकांचे सुधारित बियाणे वापरून माती परीक्षण, संसाधन संवर्धन तंत्रज्ञान (RCTs) वापरत आहे.

बियाण्याच्या सुधारित जाती वापरण्याबरोबरच, ती लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी आणि जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी बियाण्यांवर जैव खते आणि संसाधन संवर्धन तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करते.

शेतीसोबतच दुग्धव्यवसाय चालवून तिने एकात्मिक शेतीचे उदाहरण मांडले आहे. गांडूळ खताचा वापर व्हर्मी वॉशच्या उत्पादनासाठी केला जातो. काकडीच्या पिकामध्ये बांबूचा वापर आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या वैरणाची लागवड करणे.

पाण्याची समस्या पाहता त्यांनी खरीप हंगामात काही भागात भाताऐवजी मक्याची लागवड केली आहे.

हवामानातील बदल लक्षात घेता 2 वर्षांपूर्वी तिने पूर्णपणे सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांकडून सल्ला व मार्गदर्शन घेण्यात आले.

प्रयोगशील महिला शेतकरी किती कमाई करत आहे बरं..!

शेती आणि दुग्धव्यवसायातून त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे सात लाखांच्या आसपास आहे. कृषी क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मानही मिळाले आहेत. अमरप्रीतने एक प्रगतीशील महिला शेतकरी आणि प्रशिक्षक म्हणून तिच्या जिल्ह्यात ठसा उमटवला आहे आणि आता अनेक महिला तिच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. निश्चितचं अमरजीत यांनी शेतीमध्ये केलेला हा बदल त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला आहे आणि यामुळे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link