Successful Farmer: अनिल दादा फक्त तूच रे…! पट्ठ्याने लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडली, सुरु केलं मत्स्यपालन, आज पंचक्रोशीत नाव गाजतंय - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Successful Farmer: अनिल दादा फक्त तूच रे…! पट्ठ्याने लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडली, सुरु केलं मत्स्यपालन, आज पंचक्रोशीत नाव गाजतंय

0
Rate this post

[ad_1]

Successful Farmer: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) असला तरी देखील देशातील अनेक नवयुवक शेतकरी पुत्र आता शेती (Farming) पासून दुरावत चालले आहेत. विशेष म्हणजे शेतकरी बांधव (Farmer) आपल्या पाल्यांना शेती (Agriculture) न करता उच्च शिक्षण देऊन नोकरी व उद्योगधंद्यांसाठी प्रेरित करीत आहेत.

यामुळे गावाकडून शहराकडे आता मोठ्या वेगात स्थलांतर देखील होत आहे. ही निश्चितच शेती क्षेत्रासाठी व ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक चिंतेची बाब आहे. शेतकरी बांधवांच्या मते शेती व्यवसायात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने आता शेतकरी पुत्र शेती पासून लांब चालले आहेत.

मात्र असे असले तरी देशात असेही अनेक नवयुवक शेतकरी पुत्र आहेत जे काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करून लाखों रुपये उत्पन्न (Farmer Income) कमावण्याची किमया साधत आहेत. काही नवयुवक तरुण नोकरी असतानादेखील नोकरी सोडून शेती व शेतीपूरक व्यवसायात गुंतत आहेत.

विशेष म्हणजे हे नवयुवक सुशिक्षित तरुण शेती व शेती पूरक व्यवसायात चांगली कामगिरी करत इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत. छत्तीसगड राज्यातील एका सुशिक्षित तरुणाने देखील चांगल्या पगाराची नोकरी सोडून मत्स्यपालन (Fish Farming) या शेतीपूरक व्यवसायातून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.

छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यातील अनिल कुमार या नवयुवक तरुणाने कॉर्पोरेट क्षेत्रातील लाखो रुपयांची नोकरी सोडुन मत्स्यपालन व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे अनिलरावं आपल्या कामातून इतर लोकांना प्रेरित करत आहे. अनिलरावं हे मूळचे जिल्ह्यातील सीतापूर गटातील धरमपूर ग्रामपंचायतीचे रहिवासी आहेत. अनिल रावांनी नोकरीस त्यागपत्र दिल्यानंतर गावात मत्स्यपालन करण्यास सुरुवात केली आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, अनिल कुमार यांनी वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण आपल्या पुण्यातून घेतले आहे. यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत आर्थिक विश्लेषणाची नोकरी देखील केली. मात्र नोकरीमध्ये अनिल रावांचे मन काही लागेना.

मग काय अनिलरावांनी नोकरीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:चा रोजगार सुरू करण्याचा ठरवले. नोकरी सोडल्यानंतर अनिलराव गावी परतले. अनिल राव गावी आल्यानंतर त्यांनी शेतीशी निगडित स्टार्टअप सुरू करण्याचे ठरवले आणि या अनुषंगाने अनिलने 30/40 जागेवर दीड लाख रुपये खर्चून शेड बांधले.

यामध्ये त्यांनी सिमेंटचे 20 बॉक्स/टाक्या तयार करून मत्स्यशेती सुरू केली. मत्स्यबीज बाजारात महाग होत होते, त्यामुळे अनिलने स्वतः मार्केट तयार केले, ज्यामध्ये रेहू, कतला, सिंधी आणि देशी मांगूर मासळीच्या मत्स्यबिया तयार केल्या जात आहेत. यामुळे अनिल रावांचा खर्च वाचला आहे.

अनिलराव नामशेष होणाऱ्या माशांचे संवर्धन करत आहेत:- अनिलराव यांनी बाजारातून नामशेष होत असलेल्या माशांचे संवर्धन आणि सिंधी, देशी मांगूर यांसारख्या मत्स्यबीज जतन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मत्स्यबीज केंद्राच्या माध्यमातून ते लोकांना बियाणे उपलब्ध करून देत असून आज त्यांना यशस्वी शेतकरी व व्यापारी म्हटले जाते. अनिलराव म्हणतात की, “मी जे स्वप्न पाहत होतो, ते आज जगत आहे, कामात काही अडचणी आल्या, पण मेहनतीने मार्ग सुकर झाला आहे.”

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link