Successful Farmer: अरे व्वा! नोकरीला राम देत उच्चशिक्षित तरुणाने सुरु केला मुरघास निर्मितीचा व्यवसाय, आज लाखोंची कमाई शिवाय शेतकऱ्यांना दिला रोजगार - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Successful Farmer: अरे व्वा! नोकरीला राम देत उच्चशिक्षित तरुणाने सुरु केला मुरघास निर्मितीचा व्यवसाय, आज लाखोंची कमाई शिवाय शेतकऱ्यांना दिला रोजगार

0
Rate this post

[ad_1]

Successful Farmer: गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये (Farming) शेतकरी बांधवांना (Farmer) अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी सुलतानी दडपशाही यामुळे शेतकरी राजा अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. मात्र जगाचे पालन-पोषण करणारा हा बळीराजा संकटांशी झुंज देत मोठ्या ताकतीने शेती कसत आहे, काळ्या आईची सेवा करत आहे.

अलीकडे उच्चशिक्षित तरुण देखील शेती मध्ये पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे उच्चशिक्षित तरुण शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करून लाख रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधत आहेत. सध्या अनेक उच्चशिक्षित नोकरी करणारे नवयुवक शेतीमध्ये आपला हात आजमावत आहेत.

विशेष म्हणजे आपल्या ज्ञानाचा वापर करत हे नवयुवक शेतकरी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श रोवत आहेत. पुणे जिल्ह्यातील (Pune) शिरूर तालुक्याच्या एका उच्चशिक्षित तरुणाने देखील नोकरीला रामराम ठोकत शेती व्यवसायात आपले करिअर घडवले आहे.

शिरूर तालुक्याच्या मौजे करंदी येथील प्रदिप खेडकर एका नामवंत कंपनीत कामात होते. मात्र अगदी लहानपणापासून शेतीची आवड असल्याने आणि नोकरीमध्ये मन रमत नसल्याने या नवयुवकाने नोकरीचा त्याग करण्याचे ठरवले.

या अनुषंगाने आपल्या नोकरीचा राजीनामा देत या पठ्ठ्याने मुरघास निर्मितीचा व्यवसाय (Murghas) सुरू केला असून मुरघास निर्मितीच्या व्यवसायात लाखों रुपये उत्पन्न (Farmer Income) कमावण्याची किमयाही साधत आहेत. आपल्या कार्यामुळे (Animal Husbandry) प्रदीप यांनी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठेवला आहे.

खरं पाहता प्रदीप यांनी नोकरीला राजीनामा दिल्यानंतर स्वताच्या पायावर आणि हिमतीने काहीतरी करायचे या अनुषंगाने खाजगी कंपन्यांना मनुष्यबळ पुरवण्याचे काम केले. याच्या जोडीला मुरघास निर्मितीचा देखील व्यवसाय सुरू केला आहे.

शेतकरी कुटुंबातील असलेले प्रदीप यांच्याकडे वडिलोपार्जित आठ एकर शेत जमीन आहे. मात्र, असे असतानादेखील त्यांनी भाडेतत्वावर काही एकर शेत जमीन घेतली आणि मुरघास निर्मितीला सुरुवात केली.

प्रदीप यांनी सुरुवातीला 10 शेतकरी सोबत घेत मका लागवड केली. प्रदीप यांनी केलेल्या मका लागवडीतुन त्यांना दर्जेदार उत्पादन मिळाले. त्यांनी शेतकऱ्यांना वेळेत पेमेंट, चांगल्या कॉलिटीचे बियाणे उपलब्ध करून दिले. एवढेच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांना चांगला मोबदला देखील दिला. यामुळे शेतकरी देखील प्रदीप यांच्या सोबत काम करायला इच्छुक होते. आता प्रदीप यांच्यासोबत एकूण 100 शेतकरी आले आहेत आणि मक्याचे यशस्वी उत्पादन घेत आहेत.

प्रदीप यांनी सांगितले की, मूरघास बनवण्यासाठी गूळ, मीठ, खनिज मिश्रण व जिवाणू संवर्धक यांचा वापर केला जातो. चाऱ्याला गूळ, मीठ, खनिज मिश्रण, जिवाणूसंवर्धन लावले जाते आणि मग यंत्राच्या साह्याने दाब देऊन 50 किलोच्या यूव्ही संरक्षित बॅगेत मुरघास हवाबंद करून ठेवला जातो. त्यानंतर जवळपास 40 दिवसांनंतर तो वापरण्यासाठी तयार होतो.

विशेष म्हणजे प्रदीप यांनी मुरघास निर्मिती साठी एकूण बारा शेतकऱ्यांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी तयार केलेला मुरघास पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर भागातही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठवला जात आहे. त्यातून त्यांना चांगला नफा देखील मिळत आहे. निश्चितच प्रदीप यांनी शेती व्यवसायात साधलेली ही प्रगती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link