Successful Farmer: जय हो गुरु…! पट्ठ्याने इंजिनिअरिंगच्या जॉबला ठोकला राम-राम, सुरु केला पशुपालन व्यवसाय; आज महिन्याला 10 लाखांची कमाई  - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Successful Farmer: जय हो गुरु…! पट्ठ्याने इंजिनिअरिंगच्या जॉबला ठोकला राम-राम, सुरु केला पशुपालन व्यवसाय; आज महिन्याला 10 लाखांची कमाई 

0
Rate this post

[ad_1]

Successful Farmer: देशातील नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र शेती व्यवसायात (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतीपासून (Agriculture) दुरावत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकरी बांधव देखील आपल्या मुलाने किंवा मुलीने उच्च शिक्षण प्राप्त करावे आणि एखाद्या प्रतिष्ठित मल्टिनॅशनल कंपनीत काम करावे असे स्वप्न बघत असतात.

शेती व्यवसायात सातत्याने उत्पादन खर्च वाढत आहे शिवाय शेतीतून मिळणारे उत्पन्न (Farmer Income) हे खूपच तोकडे आहे. अशा परिस्थितीत शेतकरी पुत्र आता शेती नको रे बाबा असा ओरड करू लागले आहेत. मात्र असं असलं तरी देशात असे अनेक नवयुवक शेतकरी पुत्र आहेत जे नोकरीं ऐवजी शेतीला विशेष प्राधान्य देत आहेत.

असे अनेक नवयुवक आहेत जे शेती व शेतीपूरक व्यवसायात काळाच्या ओघात मोठा बदल करत शेतीतून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमयाही साधत आहेत. एकीकडे शेतकरी पुत्र शेती पासून दुरावत चालला आहे तर दुसरीकडे नोकरी करणारे नवयुवक शेती व्यवसायात करिअर घडवण्यासाठी पदार्पण करत आहेत.

विशेष म्हणजे शेती व्यवसायात उतरून हे नवयुवक चांगले नेत्रदीपक यश संपादित करत आहेत आणि इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहेत. कर्नाटक राज्यातील एका अवलियाने आपली चांगली इंजीनियरिंगची नोकरी सोडून गाय पालन (Cow Rearing) सुरु केले आणि गाय पालनातून आजच्या घडीला हा अवलिया तब्बल दहा लाखांची कमाई करत आहे.

यामुळे इंजिनिअरिंगच्या जॉबला लाथ मारण्याचा निर्णय या अवलिया साठी जणूकाही वरदानचं सिद्ध होत आहे. इंजीनियरिंग ची नोकरी सोडून गाय पालन (Animal Husbandry) सुरु करणाऱ्या या अवलियाची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली आहे.

हाती आलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या जयगुरु आचार हिंदर यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण करून तो नोकरी करत होता. पण त्याचे मन ऑफिसच्या कामात कधीचं गुंतले नव्हते. कारण की जयगुरू यांना सुरुवातीपासूनच शेतीची आवड होती. 2019 मध्ये तो नोकरी सोडून घरी आला आणि वडिलांसोबत शेती पाहू लागला.

घरी आल्यानंतर जयगुरूंनी पशुपालनाचे कामही सुरू केले. त्यांनी अल्पावधीत 130 गायींचे संगोपन केले. यानंतर दुग्ध व्यवसाय करण्याचा विचार केला, असे ते सांगतात. यासाठी जयगुरु यांनी दुग्धव्यवसाय क्षेत्रात नाविन्यपूर्ण पद्धती अवलंबल्या. त्यासाठी त्यांनी संशोधनही केले. संशोधनादरम्यान ते पटियाला येथे गेले. तेथून त्यांनी शेण सुकवण्याचे यंत्र घेतले. या कामासाठी त्यांनी 10 एकर जमीनही खरेदी केली.

आज दरमहा 10 लाख रुपये कमावतात

गाईच्या दुधासोबत ते शेणही विकतात. आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी आणि बागायतदार हे शेण खतासाठी विकत घेतात. या कामामुळे जयगुरूला महिन्याला 10 लाखांहून अधिक उत्पन्न मिळत आहे. त्याला पुढे डेअरी उत्पादने विकायची आहेत आणि त्याला त्याचा व्यवसाय पुढे न्यायचा आहे. यासाठी त्यांना सरकारच्या मदतीने सबसिडी घेऊन स्टार्टअप सुरू करायचा आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link