Successful Farmer: भावांनो याला म्हणतात नांद…!! दोन दोस्तांनी एका खोलीत सुरु केली मशरूम शेती, आज लाखोंची कमाई - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Successful Farmer: भावांनो याला म्हणतात नांद…!! दोन दोस्तांनी एका खोलीत सुरु केली मशरूम शेती, आज लाखोंची कमाई

0
Rate this post

[ad_1]

Successful Farmer: 21 वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांनी एका छोट्या खोलीत मशरूम वाढवण्याचा (Mushroom Farming) प्रयोग केला, तोही मातीशिवाय. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर दोघांनीही याची शेती (Farming) सुरू केली आणि आता अवघ्या एका वर्षात लाखो रुपये कमावण्याची (Farmer Income) किमया त्यांनी साधली आहे.

एवढेच नाही तर दोघेही शेतकऱ्यांना (Farmer) प्रशिक्षण देतात. मशरूमचे दर्जेदार बियाणे तयार करण्यासाठी स्वत:ची प्रयोगशाळाही तयार केली आहे. त्यांचे मशरूम (Mushroom) इतर अनेक राज्यांमध्ये देखील पुरवले जात आहेत.

कोटाच्या बोरखेडा आणि रंग तालाब येथील रहिवासी यशराज साहू आणि राहुल मीना हे दोन्ही जानी मित्र आहेत. यश राज यांनी 2017 मध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वीच 10 पिशव्यांसह मशरूम वाढवण्याची चाचणी केली होती. 2018 मध्ये जेव्हा त्याने कोटा कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा तिथे तो राहुलला भेटला. 

यानंतर दोघेही मशरूम लागवडीच्या प्रकल्पावर काम करू लागले. बीएस्सी अॅग्रीकल्चर करण्यासोबतच नोकरीऐवजी मशरूमची लागवड करण्याचे नियोजन आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी घरातील मोकळ्या जागेत अल्प प्रमाणात काम सुरू केले.

आता दोघांनी मिळून मशरूमच्या बिया तयार करण्यासाठी प्रयोगशाळा उघडली आहे. दोन्हीच्या पदव्या 2022 मध्येच पूर्ण झाल्या. आता त्यांनी याच व्यवसायला करिअर म्हणून निवडले असून त्यांनी एकवेळच्या पिकातून लाखो रुपये कमावले आहेत.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण पण

यशराज आणि राहुल यांनी सांगितले की, ते स्वतः त्यांच्या मशरूम शेतीसोबतच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. आत्तापर्यंत 30 ते 35 शेतकऱ्यांना मशरूम लागवडीचे तंत्र त्यांनी शिकवले आहे. त्यांनी सांगितले की, प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये असे अनेक लोक आहेत जे आयटी क्षेत्राची नोकरी सोडून मशरूमची लागवड करू इच्छितात.

मशरूमचे बिया बाहेरून आणावे लागणार नाहीत आणि त्यांची गुणवत्ताही चांगली राहावी यासाठी दोघांनी बियाणे तयार करण्यासाठी लॅबही बनवल्या आहेत. ते शेतकऱ्यांना रचना तयार करण्यापासून कापणीपर्यंत मदत करत आहेत. ते स्वत: शेतकऱ्यांकडून माल देखील खरेदी करत आहेत.

मशरूमची लागवड हवेत केली जाते

यशराज साहू आणि राहुल यांनी सांगितले की, मशरूमची लागवड हवेत केली जाते. विशेष म्हणजे यासाठी शेती किंवा मातीचीही गरज नाही. कोणीही स्वतःच्या घरात मशरूम वाढवू शकतो. घराच्या मोकळ्या खोलीत, झोपडीत किंवा रिकाम्या जागेत याची लागवड सहज करता येते.

मशरूम लागवडीसाठी गव्हाचा पेंढा आणि बियाणे आवश्यक असते.  वर्षभर त्याची लागवड करता येते. विशेष म्हणजे यासाठी तयार केलेल्या रचनेत दोरी टांगली जाते आणि पिशव्या तयार करून त्यावर टांगल्या जातात. त्यांच्या मते यातून खर्चाच्या दुप्पट उत्पन्न.

पावडर फुलांसह विकली जाते

दोन्ही मित्र मशरूमची फुले, पावडर आणि बिया या तिन्हींचे उत्पादन करत आहेत. 500 पिशव्यांमधून एक हजार किलो फुलांचे उत्पादन होते. पण, कोरडी पावडर बनवताना 10 किलो फुलांपासून 1 किलो पावडर बनते. दोन महिन्यात येणाऱ्या पिकाची भुकटी बनवून एक लाख रुपयांपर्यंत कमाई करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link