Successful Farmer: भावा फक्त तूच रे.…! बीकॉम नंतर शेती केली, अन तब्बल 40 लाखांची कमाई झाली; वाचा पट्ठ्याची अनोखी यशोगाथा  - Amhi Kastkar

Successful Farmer: भावा फक्त तूच रे.…! बीकॉम नंतर शेती केली, अन तब्बल 40 लाखांची कमाई झाली; वाचा पट्ठ्याची अनोखी यशोगाथा 

Rate this post

[ad_1]

Successful Farmer: देशातील नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र आता शेतीपासून दुरावत चालले आहेत. शेतीमध्ये (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी पुत्र आता शेती (Agriculture) नको रे बाबा असा ओरड करत आहेत.

मात्र जर शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतीतून लाखों रुपयांचे उत्पन्न (Farmer Income) मिळवले जाऊ शकते. अनेक नवयुवक सुशिक्षित तरुणांनी शेतीमध्ये उतरून शेतीतून लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमया देखील साधली आहे.

उत्तर प्रदेशमधील एका अवलिया नवयुवक तरुणाने देखील शेतीमध्ये पदार्पण करून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. पर्यावरणावरील प्रेमापोटी उत्तर प्रदेश मधील सुधीर मौर्य यांनी शेती क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग निवडला. त्यांनी नवनवीन संशोधन करून एक मोठी व्यावसायिक हायटेक रोपवाटिका (Nursery) उभारली.

भाजीपाल्याच्या रोपवाटिकेतून त्यांचे उत्पन्न तर वाढलेच, पण ते स्वत: लाखो रुपये कमावत आहेत. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन परिसरातील इतर सर्व नवयुवक तरुण तसेच शेतकरी पुत्र आता रोपवाटिका सुरू करत आहेत.

प्रयागराज-लखनौ महामार्गावरील कौडीहारमधील हाथीगहान गावात राहणारा सुधीरने अलाहाबाद विद्यापीठातून बीकॉम चे शिक्षण पूर्ण केले. त्या नंतर स्वखर्चाने बंगळुरूला गेला. तिथे प्रशिक्षण घेतले आणि मग गावात हायटेक रोपवाटिका टाकली. यामध्ये अनुदानाशिवाय पॉली हाऊस बांधण्यात आले.

आता दरवर्षी सुधीर सुमारे 80 लाख रोपांची निर्मिती आपल्या रोपवाटिकेत करत आहेत. सध्या त्यांची वार्षिक उलाढाल 35 ते 40 लाख रुपये आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील सुमारे दोन डझन जिल्हे तसेच झाशी, ग्वाल्हेर, विदिशा, शिवपुरी, मध्य प्रदेशातील सागर यासह बुंदेलखंडमध्ये देखील त्यांची रोपे पाठवले जात आहेत.

मागणी इतकी की मागणी पूर्ण करणे अशक्य

आता परिस्थिती अशी आहे की, त्यांना रोपांची मागणी पूर्ण करता येत नाही. बहुतेकजण फुलकोबी, कोबी, टोमॅटो, मिरची, वांगी (व्हायलेट, पांढरे आणि हिरवे), सिमला मिरची, सोयाबीनची आगात रोपवाटिका ते तयार करतात. पपई आणि केळीची रोपवाटिकाही ते तयार करतात.

आंबा, लिंबू, पेरू, फणस, जामुनची मातृ वनस्पती तयार केली जाते.  रोपवाटिका चांगली असेल तर भाजीपाल्याचे उत्पादन उत्तम होते, असे सुधीर सांगतात. निश्चितचं शेती पासून दुरावत चाललेल्या शेतकरी पुत्रासाठी सुधीर एक आदर्श ठरणार आहेत. 

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Leave a Comment

Share via
Copy link