Successful Farmer: भावा भारीच की रावं...! नोकरीपेक्षा शेतीला दिलं प्राधान्य, ऊस लागवडीसाठी केला हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर, लाखोंचे उत्पन्न मिळणार  - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Successful Farmer: भावा भारीच की रावं…! नोकरीपेक्षा शेतीला दिलं प्राधान्य, ऊस लागवडीसाठी केला हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर, लाखोंचे उत्पन्न मिळणार 

0
Rate this post

[ad_1]

Successful Farmer: भारत हा कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान देखील आहे. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांना (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतकरी बांधव कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, तर कधी शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे पुरता मेटाकुटीला आला आहे.

शेती व्यवसायात (Farming) केलेला खर्च काढणे देखील आता मुश्कील होत असल्याचे शेतकरी बांधव सांगत आहेत. यामुळे आता देशातील नवयुवक शेतकरी पुत्र शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. शेतीमध्ये (Agriculture) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने नवयुवक शेतकरी पुत्र शेती न करता नोकरी करण्यास अधिक प्राधान्य देत असल्याचे चित्र संपूर्ण देशात बघायला मिळत आहे.

दरम्यान देशात असे अनेक नवयुवक शेतकरी पुत्र आहेत जे नोकरी न करता अजूनही तिला विशेष प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे शेतीमध्ये हे नवयुवक शेतकरी पुत्र वेगवेगळे प्रयोग राबवून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावण्याची किमया देखील साधत आहेत. पुणे जिल्ह्यातील (Pune) बारामती तालुक्यातील एका अवलिया शेतकरी पुत्राने देखील नोकरी मागे न लागता शेती व्यवसायाला अधिक प्राधान्य दिले आणि आजच्या घडीला हायटेक पद्धतीने ऊस शेती (Sugarcane Farming) करुन हा अवलिया चांगले उत्पन्न कमवित आहे.

बारामती तालुक्यातील निंबुतमधील उच्चशिक्षित नवयुवक शेतकरी पुत्र मयूर संजय काकडे यांनी उच्चशिक्षण घेतलेले असतानादेखील नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने या युवा शेतकऱ्याने ऊस या नगदी पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला. मयूर यांनी ऊस लागवड करण्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी युट्युब वर माहितीची शोधाशोध केली युट्युब वर यंत्राचा तपास केला आणि तदनंतर ऊस लागवड करण्यासाठी आधुनिक यंत्राची खरेदी केली.

ऊस लागवड करण्यासाठी आधुनिक यंत्रांची खरेदी केल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच यांत्रिकी पद्धतीने ऊस लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. खरं पाहता सोमेश्‍वर कारखान्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली जाते. हजारो हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होत असल्याने अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागतो. मयूर यांनादेखील ऊस लागवड करण्यासाठी मजूर टंचाईचा सामना करावा लागला असल्याने, या युवा शेतकऱ्याने यावर यांत्रिकीकरणाचा तोडगा काढला आहे.

मजूर टंचाईचा कायमचा निकाल लावण्यासाठी मयूर यांनी सव्वा दोन लाख रुपयांचे ऊस लागवडीचे यंत्र खरेदी केले आहे. मयूर यांनी ऊस लागवडीसाठी आणलेल्या या यंत्राची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या यंत्राच्या माध्यमातून ऊस लागवड तर केली जातेचं शिवाय भाजीपाला वर्गीय पिकांची देखील लागवड शक्‍य आहे. एकंदरीत या यंत्राच्या माध्यमातून कोणत्याही रोपाची लागवड करता येते. या यंत्रात सेटिंग करून रोप हवे त्या अंतरावर लावता येते.

यंत्राच्या माध्यमातून लागवड केल्यास रोप दोन इंच जमिनीत पुरले जाते. मयूर यांनी खरेदी केलेले यंत्र दोन ते तीन एकर क्षेत्रात एका दिवसात ऊस लागवड करण्यासाठी सक्षम आहे. मयूर यांच्या मते, या यंत्रामुळे मजुरीवर होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचणार आहे. निश्चितच शेतीमध्ये आता शेतकरी बांधवांना आधुनिक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. मयूर यांनी या आधुनिक तंत्राचा वापर करून हे दाखवून दिले आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link