Successful Farmer: मानलं लेका तुला…! युट्युबवर व्हिडिओ पाहून एका एकरात स्ट्रॉबेरी लागवड केली; 6 लाखांची कमाई झाली - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Successful Farmer: मानलं लेका तुला…! युट्युबवर व्हिडिओ पाहून एका एकरात स्ट्रॉबेरी लागवड केली; 6 लाखांची कमाई झाली

0
Rate this post

[ad_1]

Successful Farmer: देशात शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून रोजाना नवनवीन प्रयोग कार्यान्वित करीत आहेत. काळाच्या ओघात शेतीमध्ये (Farming) केलेला हा बदल शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याचा ठरत आहे.

जर शेतीमध्ये पीकपद्धतीत बदल केला तर निश्चितच लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) करणे शेतकरी बांधवांना शक्य होणार आहे. बिहार (Bihar) मधील एका शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात बदल करत लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.

बिहारच्या भागल्पुर जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्याने काळाच्या ओघात पीकपद्धतीत बदल करत स्ट्रॉबेरी शेती (Strawberry Farming) सुरु केली. भागलपूर जिल्ह्यातील मौजे खरीकचे तीन शेतकरी सध्या स्ट्रॉबेरीची शेती करीत आहेत. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरी शेतीतुन मिळणारी स्ट्रॉबेरी ते शेतकरी ऑनलाईन पद्धतीने विक्री करत आहेत.

खरीक येथील उस्मानपूरचे शेतकरी खगेश मंडळ आज स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करत आहेत. त्यांच्या शेतात लागवड केलेल्या स्ट्रॉबेरी फळांची ऑनलाइन विक्री केली जात आहे. त्याच्यासोबत आणखी दोन शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. यासोबतच काजरेली येथील गुंजेश गुंजन व कहलगाव येथील शेतकरीही स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. स्ट्रॉबेरीचे रोप फुलू लागताच ऑनलाइन बुकिंग सुरू होते.

यूट्यूब विडिओ पाहून स्ट्रॉबेरी लागवड सुरू केली

खरिक ब्लॉकमधील उस्मानपूरचे शेतकरी खगेश मंडल हे कोबीची शेती करायचे. त्यांनी यूट्यूबवर स्ट्रॉबेरीच्या लागवडीची माहिती घेतली. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर बिहार कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधला.

बीएयूच्या शास्त्रज्ञांनी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास प्रोत्साहन दिले. सर्व सुविधा देऊन शेतीची तांत्रिक माहिती दिली. 2018 मध्ये खगेशने त्याच्या सहकारी शेतकऱ्यासोबत महाबळेश्वर, पुणे येथून सात हजार रोपे आणली आणि अर्ध्या एकरात लावली. 

एक रोप 15 रुपयांना विकत घेतले. पहिल्या वर्षीच चांगले पीक आले. शेतकरी खगेश मंडळने यावर्षी एक एकरात स्ट्रॉबेरीची लागवड केली. या पिकाची लागवड करण्यासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च आला, तर उत्पन्न पाच ते सहा लाख रुपये आल्याचे त्यांनी सांगितले.

स्ट्रॉबेरी शेती ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे विक्रीसाठी बाजार शोधण्याची गरज नसते. या शेतकऱ्यांना देखील स्ट्रॉबेरी विक्रीसाठी कुठलीच अडचण आली नाही. परिणामी त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे.

निश्चितच या शेतकऱ्याने काळाच्या ओघात केलेला हा बदल इतरांसाठी प्रेरणा देणारा आहे. शेती व्यवसायात सातत्याने नवनवीन प्रयोग करत राहिले तर निश्चितच कमी क्षेत्रात देखील अधिक उत्पन्न मिळवले जाऊ शकते हे या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठीआम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link