Successful Farmer: शेतकऱ्याचा शेतीत अभिनव उपक्रम..! हरभरा बियाणं विकून कमवतोय लाखों, वाचा सविस्तर - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Successful Farmer: शेतकऱ्याचा शेतीत अभिनव उपक्रम..! हरभरा बियाणं विकून कमवतोय लाखों, वाचा सविस्तर

0
Rate this post

[ad_1]

Successful Farmer: शेतीमध्ये (Agriculture) बदल केला तर निश्चितच शेती (Farming) हा फायद्याचा सौदा ठरू शकतो. देशातील अनेक शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये आता बदल करीत आहेत आणि चांगले उत्पन्न (Farmer Income) अर्जित करीत आहेत. गुजरात मधील एका शेतकरी बांधवाने देखील शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करत लाखों रुपयांची कमाई करून दाखवली आहे.

एकेकाळी रोग आणि किडींमुळे हरभरा लागवडीपासून (Gram Cultivation) दूर राहिलेले गुजरातचे शेतकरी बांधव आता याच्या बीजोत्पादनातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील करमाड गावचे शेतकरी सोलंकी खुमानसिंग वालजीभाई एकेकाळी फक्त घरगुती वापरासाठी हरभरा पिकवत असत.

परिसरातील इतर शेतकऱ्यांप्रमाणे तोही जुन्या स्थानिक वाणांच्या बियाण्यांनी शेती करत असे. या जुन्या जातींवर हेलीकव्हरमेगारा अळ्या आणि विल्ट रोगाचा प्रादुर्भाव झाला, ज्यामुळे उत्पादन खूपच कमी झाले. उत्पादन कमी असल्यामुळे कमाई फारशी होत नव्हती. मात्र कृषी विज्ञान केंद्राच्या मध्यस्थीनंतर परिसराचे चित्र पालटले. आता करमाड हे गाव उच्च दर्जाच्या हरभरा बियाण्यासाठी लोकप्रिय झाले आहे.

करमाड गावात खरीप हंगामात कापूस, तीळ, बाजरी या पिकांची लागवड केली जाते. रब्बी हंगामात गहू, जिरे आणि हरभरा ही पिके घेतली जातात. पूर्वी येथील शेतकरी सैल बियाणे (स्वदेशी) पेरत असत, त्यामुळे उत्पादन खूपच कमी होते. सोलंकी खुमानसिंग वालजीभाई हे देखील असेच करायचे, त्यामुळे त्यांना हरभरा पिकातून नफा मिळत नव्हता. म्हणूनच ते फक्त घरगुती वापरासाठीच तयार करायचे.

परंतु 2015-16 मध्ये, कृषी विज्ञान केंद्र JAU, सुरेंद्रनगर यांनी NFSM क्लस्टर FLD अंतर्गत 50 शेतकऱ्यांना 20 हेक्टर क्षेत्रात उत्पादनासाठी हरभरा GJG-3 सुधारित वाण उपलब्ध करून दिले. सोलंकी खुमानसिंग वालजीभाई हे देखील त्यापैकी एक होते. काबुली हरभरा या जातीचे उत्पादन खूप चांगले झाले आणि आसपासच्या गावातील इतर शेतकऱ्यांमध्येही त्याची मागणी वाढू लागली.

हे लक्षात घेऊन खुमानसिंग भाई यांनी लगेचच पुढील वर्षी चांगला नफा मिळविण्याच्या उद्देशाने मोठ्या क्षेत्रावर या जातीचे उत्पादन सुरू केले. सुधारित वाण निवडून त्यांनी हरभरा लागवडीत अपेक्षित नफाही मिळवला. यातून चांगला नफा मिळू शकतो म्हणून कृषी विज्ञान केंद्राने अनेक शेतकऱ्यांना बियाणे उत्पादनाचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला आणि खुमानसिंग यांनी हा सल्ला पाळला.

हरभरा लागवडीतून भरघोस बियाणे उत्पादन

खुमान सिंग यांनी 2016-17 मध्ये 2 हेक्टर क्षेत्रात बंपर बियाणे तयार केले. त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने बियाणांची योग्य साठवण केली. बियांचे वर्गीकरण करून हवाबंद दुहेरी थर असलेल्या प्लास्टिकच्या लॅमिनेटेड पिशव्यांमध्ये ठेवले. त्याच वेळी, कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने, त्यांनी किसान मेळावा, प्रदर्शन, शेतकरी सभा, क्षेत्र दिन आणि प्रशिक्षण कार्यक्रम यांसारख्या शेतीशी संबंधित अनेक कार्यक्रमांमध्ये हरभऱ्याच्या सुधारित बियाणांचा प्रचार केला. याचा फायदा असा झाला की खुमानसिंग यांच्या घरातूनच 60 क्विंटल बियाणे विकले गेले, म्हणजे 60 क्विंटल बियाणे कोणत्याही वाहतूक खर्चाशिवाय विकले गेले.

अधिक उत्पादन करण्यास प्रवृत्त

बियाण्याची लोकप्रियता पाहून खुमानसिंग यांनी रब्बी हंगाम 2016-17 साठी 2 हेक्टर जमिनीत पेरणी केली आणि 62 क्विंटल उत्पादन मिळाले. त्यापैकी 60 क्विंटल बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आले व ते 23 शेतकऱ्यांना रास्त भावात विकले. यातून त्याला चांगले उत्पन्न मिळाले. काबुली हरभरा बियाणे 7500 प्रति क्विंटल दराने विकले गेले.

अशाप्रकारे त्यांनी 2 हेक्टर क्षेत्रातून 4.61 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवले. त्यांना बियाणे विक्रीचा फायदा तर होतोच, शिवाय जवळच्या शेतकर्‍यांना बाजारातून कमी किमतीत चांगल्या दर्जाचे बियाणे मिळत असल्याने त्यांचाही फायदा होत आहे.  अल्पावधीतच करमाड हे गाव हरभऱ्याच्या सुधारित जातीच्या बियाणांच्या उत्पादनासाठी लोकप्रिय झाले आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link