Successful Farmer: युवा शेतकऱ्याची कमाल..! माळरान जमिनीवर फुलवली खजूरची बाग, होणार लाखोंची कमाई - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Successful Farmer: युवा शेतकऱ्याची कमाल..! माळरान जमिनीवर फुलवली खजूरची बाग, होणार लाखोंची कमाई

0
4.5/5 - (2 votes)

Successful Farmer: आपल्या देशात आता काळाच्या ओघात बदल करत मोठ्या संख्येने शेतकरी बांधव (Farmer) पारंपारिक शेतीचा (Farming) मोह सोडून सेंद्रिय शेतीकडे (Organic Farming) वाटचाल करत आहेत आणि त्यांच्या समर्पक कार्यामुळे आणि नवीन तंत्रज्ञानामुळे त्यात यश देखील मिळवत आहेत.

खुद्द सरकार देखील शेतकऱ्यांना सतत पारंपरिक शेती सोडून फळबाग आणि भाजीपाला शेती करण्याचे आवाहन करत आहे. आता मायबाप सरकाराच्या आवाहनाला साद घालत हरियाणातील (Hariyana) चरखी दादरी जिल्ह्यातील शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीद्वारे (Agriculture) वालुकामय जमिनीवर खजूर (date farming) आणि हळद पिकवून (Turmeric Farming) भन्नाट कामगिरी केली आहे.

चरखी दादरी जिल्ह्यातील गोपी गावातील मनोहर नावाचा हा शेतकरी त्याच्या कारनाम्यामुळे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनला आहे. सेंद्रिय शेती करून केवळ चांगले पीक घेतले नाही तर लाखो रुपयांची कमाई करून स्वत:ची आर्थिक उन्नतीही केल्याचे त्यांनी सांगितले. मनोहर यांनी सांगितले की 2016 पासून ते टोमॅटो, मिरची, काकडी आणि हिरव्या भाज्यांची लागवड करत आहेत आणि भरपूर उत्पादन घेत आहेत. यासोबतच ते हळदीची लागवड करतात, त्यातून देखील भरपूर उत्पन्न मिळते.

सेंद्रिय शेती नफ्याचा सौदा

शेतकरी मनोहर म्हणाले की, गहू आणि मोहरी पिकांसाठी जास्त मेहनत आणि खर्च लागतो, परंतु भाजीपाला लागवड करून कमी खर्चात जास्त नफा मिळवता येतो. भाजीपाला पिकाला रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ते स्वत: सेंद्रिय खत तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, सेंद्रिय शेती आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. वालुकामय जमिनीवर पाच एकरात खजूरची झाडे लावली असून लवकरच त्यांना फळे लागतील, असे मनोहर यांनी सांगितले.

2 एकर जागेवर नेट हाऊस उभारले 

शेतकरी मनोहर यांनी सांगितले की, त्यांनी दोन एकर जागेवर नेट हाऊस उभारले असून त्यात हिरव्या मिरचीची लागवड केली जात आहे. नेट हाऊस उभारण्यासाठी शासनाकडून अनुदानही देण्यात आले आहे. इतर शेतकऱ्यांनी या तंत्राचा अवलंब करावा, असे आवाहन करून त्यांनी कमी खर्चात अधिक नफा मिळवून आर्थिक स्थिती मजबूत करता येईल, असे सांगितले आहे.

या प्रकारच्या शेतीमध्ये रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते आणि जैव खतांचा वापर केला जात असल्याचे शेतकरी मनोहर यांनी सांगितले. पाणी साठवण्यासाठी तलावही केले आहेत. पावसाळ्यात तलावात पाणी साठते. या पाण्यात मत्स्यपालन करून अतिरिक्त व्यवसायही करता येत असल्याचे मनोहर यांनी सांगितले. निश्चितच शेतीमध्ये मनोहर यांनी केलेली ही कामगिरी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे.

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Khajur Sheti Yashogatha
Share via
Copy link