Successful Farmer| satara farmer cultivate apple orchard on barren land - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Successful Farmer| satara farmer cultivate apple orchard on barren land

0
Rate this post

[ad_1]

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करत आहेत. विशेष म्हणजे काळानुरूप केलेला हा बदल शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव उत्पादनवाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीकडे वळले आहेत. राज्यात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात डाळिंब, द्राक्ष, पपई, केळी यांसारख्या फळबाग वर्गीय पिकांची शेती करत असतात.

मात्र आता यापलीकडे देखील शेतकरी बांधवांनी विचार करण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी बांधव आता काश्मिर आणि हिमाचल प्रदेश सारख्या थंड हवामानात उत्पादित केल्या जाणाऱ्या सफरचंदाची (Apple) देखील आपल्या राज्यात शेती करू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी विदर्भातील एका शेतकऱ्याने ही किमया साधली होती.

पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील सफरचंद लागवड (Apple Farming) यशस्वी करून दाखवली आहे. आता या यादीत पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील (Satara) एका अवलिया शेतकऱ्याचे नाव जोडले गेले आहे. सातारा जिल्ह्यातील मौजे पुसेसावळी येथील मानसिंगराव माळवे या प्रयोगशील शेतकऱ्याने ही किमया साधली आहे. यामुळे सध्या पंचक्रोशीत मानसिंग रावांची मोठी चर्चा रंगली आहे.

मित्रांनो खरे पाहता सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका (Khatav taluka) हा एक पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळ ग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात या तालुक्यात तापमान चाळीशी पार जाते.

अशा उष्ण हवामानात सफरचंद हे थंड हवामानात येणारे पीक मानसिंग रावांनी यशस्वीरीत्या उत्पादित करून दाखवले आहे. यामुळे मानसिंगराव यांचे विशेष कौतुक केले जात आहे. मानसिंग राव यांनी या माळरानावर सफरचंदाची बाग यशस्वीरित्या लागवड केली असून आता या सफरचंदाला सफरचंद देखील लगडलेले आहेत.

खटाव तालुका दुष्काळग्रस्त तालुका असून येथील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करून फळबाग लागवड करत असतात. मानसिंगराव यांनीदेखील नाविन्यपूर्ण प्रयोग करत सफरचंद या पिकाची खटाव सारख्या उष्ण हवामानात विशेष म्हणजे माळरानावर यशस्वी लागवड करून दाखवली आहे.

सफरचंद लागवड करण्याआधी मानसिंगराव यांनी सफरचंद शेती विषयी काही बारकावे देखील समजून घेतले. यासाठी त्यांनी गुगल आणि युट्युब चा प्रभावी वापर केला. एवढेच नाही हिमाचल प्रदेश मधील काही शेतकऱ्यांचा त्यांनी सल्ला घेऊन सफरचंद लागवडीत आपला हात आजमावला.

हिमाचल प्रदेश मधील शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मानसिंगराव यांनी डिसेंबर महिन्यात सफरचंद लागवड केली. मानसिंगराव यांनी सफरचंदाची एचआर 99 ही जात लागवड केली आहे. गत वर्षी लागवड केलेल्या या सफरचंदाला अवघ्या 13 महिन्यात सफरचंद लागली आहेत.

मानसिंगराव यांनी शेतीत केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. मानसिंग रावांचे पूर्व उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी देखील तोंड भरून कौतुक केले आहे. निश्चितचं मानसिंग रावांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आहे

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link