Sugarcane Farming: ऊसाची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल..! पण तांबेरा रोगावर 'या' पद्धतीने नियंत्रण मिळवावं लागणार; वाचा सविस्तर - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Sugarcane Farming: ऊसाची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल..! पण तांबेरा रोगावर ‘या’ पद्धतीने नियंत्रण मिळवावं लागणार; वाचा सविस्तर

0
Rate this post

[ad_1]

Sugarcane Farming: आपल्या महाराष्ट्रात उसाची शेती (Sugarcane Cultivation) सर्वाधिक केली जाते. खरं पाहता ऊस हे एक बागायती पीक असून याला नगदी पिकाचा (Cash Crops) दर्जा प्राप्त आहे. उसाची शेती शेतकरी बांधवांसाठी (Farmer) फायद्याची ठरत असल्याने शेतकरी बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्नवाढीच्या (Farmer Income) अनुषंगाने या बागायती पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू केली आहे.

राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्रात, विदर्भात, मराठवाड्यात सर्वत्र उसाची शेती नजरेस पडते. यामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण ऊस या नगदी पिकावर असल्याचे सांगितले जाते. मात्र ऊस जरी एक नगदी पीक असले तरी देखील या पिकावर रोगांचे सावट नजरेस पडते आणि मग उसाच्या उत्पादनात मोठी घट होते परिणामी शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. मित्रांनो ऊस या मुख्य पिकावर तांबेरा या रोगाचे देखील मोठ्या प्रमाणात सावट दरवर्षी पहायला मिळते.

अशा परिस्थितीत या रोगावर वेळीच नियंत्रण (Sugarcane Disease) मिळवणे अतिशय आवश्यक असल्याचे तज्ञांकडून नमूद करण्यात आले आहे. तज्ञ लोकांच्या मते, तांबेरा रोगामुळे ऊस पिकाचे भले मोठे नुकसान होते. यामुळे उत्पादनात मोठी घट होते परिणामी शेतकऱ्यांनी केलेली मेहनत आणि हजारो रुपयांचा खर्च दोघेही वाया जातात. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या ऊस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी तांबेरा रोग लक्षण आणि तांबेरा रोगाचे नियंत्रण कशा पद्धतीने केले जाऊ शकते याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया ऊसा वरील तांबेरा रोग व त्यावर केले जाणारे उपाय.

उसासाठी घातक ठरणाऱ्या तांबेरा रोगाचे लक्षणें नेमकी कोणती आहेत बरं…!

जाणकार लोकांच्या मते, ऊस पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास लहान व लांबट पिवळे ठिपके पानाच्या खालच्या बाजूस दिसून येतात. रोगाचा प्रादुर्भाव जसजसा वाढत जातो तसतसे ठिपक्यांची लांबी देखील वाढते. कालांतराने या ठिपक्याचा रंग लालसर तपकिरी किंवा तपकिरी होतो. यामुळे या रोगाला तांबेरा म्हणतात.

या रोगाच्या प्रादुर्भावामुळे ऊस पिकावर ज्या ठिकाणी ठिपके पडतात त्या ठिकाणी किंवा तो भाग बुरशीच्या आणि बिजाणूंच्या वाढीमुळे फुगीर बनत जातो. उसाच्या पानांच्या ठिपक्यालगतचा भाग प्रादुर्भाव वाढला की फुटतो आणि मग त्यातून नारिंगी किंवा तांबूस-तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडत असतात.

उसासाठी घातक ठरणा-या तांबेरा रोगाचे या पद्धतीने नियंत्रण मिळवा, लाखों कमवा …!

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, नत्रयुक्त खताचा तसेच इतर खताची मात्रा ऊस पिकाला उशिरा देऊ नये. तसेच ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी उसाच्या फडातून पाण्याचा निचरा करण्याची पर्याप्त व्यवस्था करावी. यामुळे तांबेरा रोगावर प्रतिबंध केला जाऊ शकतो.

तसेच, या घातक रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी, प्रोपिनेब 2.5 ग्रॅम किंवा मॅंकोझेब 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. पिकाला ही फवारणी व्यवस्थित रित्या असावी या हेतूने या फवारणीत स्टीकर मिसळण्याचा सल्ला दिला जातो. ही फवारणी शेतकरी बांधव दहा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळेस करू शकतात. त्यामुळे निश्चितच तांबेरा रोगावर नियंत्रण मिळवता येणार आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link