Tauktae Cyclone Live : तौकते चक्रीवादळ कुठे आहे? या जिल्ह्यात भयंकर वादळी पाऊस व सतर्कतेचा इशारा

🔴LIVE – चक्रीवादळ सध्या कुठे आहे? पाहा Cyclone Tauktae tracking | 24 तासांचा हवामान अंदाज | Weather

🔴LIVE 🔴- चक्रीवादळ सध्या आहे तरी कुठे ? पाहा Cyclone Tauktae in Arabian sea tracking

Cyclone Tauktae LIVE : तोक्ते धडकलं; इथे भयंकर नुकसानासह 80 ते 90 किमी/तास वेगाने वारे

अरबी समुद्रात तयार झालेलं तोक्ते (Cyclone Tauktae) चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे. शिवाय किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चक्रीवादळामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 40 घरांचे नुकसान, वैभववाडी तालुक्यास सर्वाधित फटका

तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी १२ वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 31 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली आहे. या वादळाचा सर्वाधित फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला आहे. वैभववाडी तालुक्यात एकूण २७ घरांचे नुकसान झाले आहे. तर एका ठिकाणी झाड पडले असून २ शांळांचे, एका स्मशान शेडचे आणि एका शेळीपालन शेडचे नुकसान झाले आहे. एक विद्युतपोलही वैभववाडी तालुक्यात पडला आहे. 

Tauktae Cyclone Live : तौकते चक्रीवादळ कुठे आहे? आजचा हवामान अंदाज व चक्रीवादळ माहिती

Tauktae Cyclone Latest Update | अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे.

दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या वादळादरम्यान राज्यातील किनारपट्टी भागात जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

तौक्ते वादळचा प्रवास नेमका कसा?

कोकणात आज धडकणार चक्रीवादळ तौक्ते वादळ हे आज तीव्र होईल

दोन दिवसात कोकण ,गोवा पार करुन मंगळवारी गुजरातच्या द्वारकेजवळ धडकेल

कशा असेल तौक्ते वादळ प्रवास

  • 14 मे लक्षद्वीप निर्मिती
  • 15 मे कोकण व गोवा किनारपट्टी प्रवास सुरु
  • 16 मे चक्रीवादळात रुपांतर
  • 17 मे मुंबईजवळून गुजरातच्या दिशेने जाणार

कोकण व गोवा किनारपट्टीवर पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान येणार ( वेग ताशी 160 ते 170 किमी ) 18 मे राजकोटला पोहोचणार 19 मे राजस्थानमधून कराची मार्गे पाकिस्तानकडे जाणार.

हे पण वाचा:

Leave a Comment

X