Titar Palan Profit: कुक्कुटपालन आणि बदक पालनापेक्षाही हा आहे चांगला व्यवसाय, या पक्षाचे पालन करून कमवा जास्त नफा…… - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Titar Palan Profit: कुक्कुटपालन आणि बदक पालनापेक्षाही हा आहे चांगला व्यवसाय, या पक्षाचे पालन करून कमवा जास्त नफा……

0
Rate this post

[ad_1]

Titar Palan Profit: भारतातील खेड्यापाड्यात कुक्कुटपालन (Poultry) आणि बदक पालन (Duck rearing) मोठ्या प्रमाणावर केले जाते. या सगळ्यात अनेक शेतकरी तितराचे संगोपन करताना दिसतात. मात्र ही संख्या खूपच कमी आहे. तीतर हा वन्य पक्षी (Wild birds) आहे. त्याचे मांस अतिशय चवदार असते. लोक मोठ्या आवडीने ते खातात. तीतर ला लहान पक्षी म्हणून देखील ओळखले जाते.

भारत सरकारने तितराच्या शिकारीवर बंदी घातली आहे. त्यांची शिकार इतकी वाढली आहे की, ते नामशेष होण्याच्या मार्गावर आले आहेत. तीतर पाळायचे असेल तर त्यासाठी सरकारकडून परवाना घ्यावा लागेल. परवाना भेटल्यावर तुम्ही तितर पालन (Pheasant rearing) करून शकता.

एका वर्षात 300 अंडी घालण्याची क्षमता –

तज्ज्ञांच्या मते, मादी तितराची वर्षभरात 300 अंडी घालण्याची क्षमता असते. बहुतेक तीतर त्यांच्या जन्मानंतर 45 ते 50 दिवसांत अंडी घालू लागतात. त्याचा व्यवसाय फार कमी वेळात सुरू करता येतो. यासोबतच त्यांची घटणारी संख्या वाढणार असून तीतर पालकालाही भरघोस नफा मिळणार आहे.

या पक्ष्यांचा आकार लहान व वजन कमी असल्याने अन्न व जागेची गरजही कमी असते.व्यवसायात गुंतवणूकही कमी असते. फक्त 4-5 तीतर ठेवून त्याचा व्यवसाय सुरू करता येतो.

पोषक तत्वांनी समृद्ध –

तितराची अंडी रंगीबेरंगी असते. त्यात कार्बोहायड्रेट (Carbohydrates), प्रथिने (Protein), चरबी आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. प्रति ग्राम अंड्यातील पिवळ बलक 15 ते 23 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल आढळते.

अनेक रोगांना बरे होण्यासाठी त्याच्या अंड्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय त्याचे मांसही कोंबडी पेक्षा चांगल्या किमतीत बाजारात विकले जाते. ज्यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता,

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link