[ad_1]
पंजाबमधील मतदारांनी दिलेला कौल हा काँग्रेससाठी धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarkhand), पंजाब (Punjab), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections 2022) निकाल गुरुवारी (१० मार्च) जाहीर झाले. या निकालांवर भाष्य करताना पवार यांनी, लोकशाहीत जनतेने दिलेला कौल मान्य करून त्याचा सन्मान करण्याची गरज व्यक्त केली.
व्हिडीओ पहा-
पंजाबमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता होती, मात्र तिथे मतदारांनी आम आदमी पक्षासारख्या (Aam Aadmi Party) प्रादेशिक पक्षाला कौल दिला. आप हा अलीकडील काळात तयार झालेला राजकीय पक्ष आहे. दिल्लीत त्या पक्षाची सत्ता आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत या पक्षाने सातत्याने यश मिळवले, ज्या प्रकारे प्रशासन दिले त्याचा प्रभाव पंजाबमध्ये झाला आहे.
येत्या काळात देशात प्रभावशाली राजकीय पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे पवार म्हणाले आहेत. येत्या १४ मार्चपासून संसदेचे अधिवेशन सुरु होणार असून त्यादरम्यान सर्व विरोधी पक्षाचे सदस्य दिल्लीत उपस्थित असणार आहेत. त्यावेळी पुढील रणनीतीबाबत चर्चा होऊ शकते, असेही पवार यांनी नमूद केले आहे.
पंजाब वगळता अन्य ठिकाणी लोकांनी आहे त्या सरकारला समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातील सकारात्मक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ‘अभी महाराष्ट्र बाकी है’ च्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत, या प्रतिक्रियेवर पवार यांनी ‘तो महाराष्ट्र भी तयार है’ असे स्पष्ट करत महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.