[ad_1]
पुणे : येत्या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सध्या तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. या प्रणालीद्वारे राज्यात पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे पोहोचण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाच्या सुत्रांनी ॲग्रोवनशी बोलताना सांगितले. त्यामुळे तयार होणाऱ्या कमी दाबाच्या प्रभावाखाली राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता असल्याचेही सुत्रांनी म्हटले आहे.
Thundershower/rainfall activity expected over parts of Maharashtra from 7th of March.
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY भेट द्या pic.twitter.com/rWLmZM0X8p— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 5, 2022
या पावसाची तिव्रता कमी असेल, मात्र सोबतीला वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा (yellow alert) देण्यात आला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात समुद्राचे तापमान वाढल्यामुळे मार्च ते एप्रिलच्या मध्यापर्यंत अशा स्वरुपाचा अवकाळी पाऊस पडण्याचा महाराष्ट्राला अनुभव आहे. त्यामुळे यात असामान्य वाटण्यासारखे काहीही नसले तरी काळजी घेणे आवश्यक असल्याचेही सुत्रांनी सांगितले.
Trough in Easterlies च्या प्रभावाखाली,
7 ते 9 मार्च, दरम्यान महाराष्ट्र,गुजरात,पू.राजस्थान व प.मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता
कोकणात ढगाळ वातावरण,हलक्या पावसाची शक्यता. मराठवाडा,मध्य महाराष्ट्,विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता
– IMD pic.twitter.com/h36Vx3T2q2— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 5, 2022
ही परिस्थिती महाराष्ट्रापूरतीच मर्यादीत नसून ७ ते ९ मार्च दरम्यान गुजरात, पूर्व राजस्थान, आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागांमध्येही विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवल्याची माहिती विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.
हे देखील वाचा : अबब… मार्चमध्येच राज्यातील ‘या’ भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान!
कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे?
सोमवार (ता. ०७) : पालघर, ठाणे, अहमदनगर, पुणे, आणि भंडारा
मंगळवार (ता. ०८) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, नांदेड, भंडारा, आणि गोंदिया
बुधवार (ता. ०९) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, आणि गोंदिया
या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता –
सोमवार (ता. ०७) : धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, आणि बुलढाणा
मंगळवार (ता. ०८) : धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, आणि यवतमाळ
बुधवार (ता. ०९) : धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, आणि यवतमाळ.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.