Weather forecast of Punjabrao dakh till 20th July Heavy rain will fall in this district| पंजाबरावांचा 20 जुलै पर्यंतचा हवामान अंदाज…! या जिल्ह्यात कोसळणार धो-धो पाऊस; वाचा डख यांचा सविस्तर अंदाज
[ad_1]

Monsoon Update: राज्यात 15 आणि 16 जुलै या दोन दिवस पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यात मौसमी पावसासाठी (Monsoon News) पोषक वातावरण तयार झाले आहे. सध्या राज्यात मुसळधार पावसामुळे (Rain) तसेच काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे (Monsoon) खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.
मोठ्या कष्टाने पेरलेल्या खरिपातील पिकांची आपल्या डोळ्यासमोर राख होताना शेतकरी बांधवांना बघावे लागले असल्याने शेतकरी बांधव पुरता खालावला गेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अतिवृष्टी सारख्या पावसामुळे खरिपातील पिकांची नासाडी झाली असल्याने शेतकरी बांधवांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे.
आधीच हजारो रुपयांचा खर्च आणि आता पुन्हा एकदा दुबार पेरणी करण्यासाठी खर्च करावा लागणार असल्याने शेतकरी बांधवांची काळजाची धडधड देखील वाढली आहे. शेतकरी बांधवानी आपल्या जवळ असलेल्या पैशाचा खरीपात पहिल्यांदा पेरणी करण्यासाठी वापर केला आहे.
यामुळे आता दुबार पेरणी करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडे उभा राहिला आहे. दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान आपल्या अचूक हवामान अंदाजासाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) सार्वजनिक करण्यात आला आहे.
पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी 20 जुलैपर्यंत आपला हवामान अंदाज आता जाहीर करण्यात आला आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार, राज्यात पुन्हा एकदा मौसमी पाऊस कोसळणार आहे.
पंजाबरावांच्या मते (Panjab Dakh Weather Report), कालपासून राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात आजपासून 20 जुलै पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात एवढेच नाही या कालावधीत जोरदार पाऊस कोसळणार आहे.
या जिल्ह्यात कोसळणार धो-धो पाऊस
20 जुलैपर्यंत राज्यातील चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा, नादेंड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, लातूर, परभणी, बिड, जालना, संभाजीनगर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पंजाब रावांनी वर्तवला आहे. पंजाबराव यांच्या मते या कालावधीत पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ मध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
[ad_2]
आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.