Well Subsidy नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे पोकरा अंतर्गत नवीन विहीर योजना ची माहिती देणार आहोत, या योजनेत ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेली शेतकरी याचा सहभागी होऊ शकतात. मित्रांनो, हि योजना नेमकी कशी कार्य करते व कोणकोणते शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात हे आपण पाहणार आहोत.
शेतकरी मित्रानो, या यौजनेत सहभागी होण्यासाठी आपल्याला काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे, तरच आपण या विहीर अनुदान योजनेसाठी पात्र ठरू शकतो आणि या योजनेचा लाभ मिळवू शकतो.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व यादीत नाव पाहण्यासाठी खालील बटणवर टच करा

कोणाला या योजनेचा लाभ घेता येतो ते पाहूया Well Subsidy
- विहीर घेण्यासाठी एकूण जमीनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध असणे तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नय प्रस्तावित विहीर व अस्तित्वात असलेल्या इतर विहिरीचे अंतर 150 मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- गावामधील अस्तित्वातील व प्रस्तावित असे एकूण सिंचन विहिरी ची घनता लागवडी योग्य क्षेत्राच्या 8 विहिरी प्रति चौरस किलोमीटर असणे आवश्यक आहे.
.
- भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कडील पाणी उपलब्धतेचे प्रमाण पत्र आवश्यक आहे.
- भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रमाणे अति शोषित व शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरी घेण्यास मनाई आहे.
- नवीन विहीर खोदणे व अन्य बाबींची पूर्तता करण्यासाठी कमाल एक वर्षाचा कालावधी देणे गरजेचे आहे.100% रुपये 2.50 लाख अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व यादीत नाव पाहण्यासाठी खालील बटणवर टच करा
