[ad_1]
पुणेः युद्धामुळे सोयाबीनच्या दरात मोठी तेजी आली. मात्र रशिया आणि युक्रेनमध्ये तर नगण्य सोयाबीन उत्पादन होते. सोयाबीनचं होत नाही तर सोयातेल होण्याचा प्रश्नच नाही. मग या युद्धाचा आणि सोयाबीनमधील तेजीचा संबंध काय? असा प्रश्न पडतो. कारण सध्याच्या परिस्थितीत पामतेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाचीही टंचाई भासत आहे.
जगात ब्राझील सोयाबीन (Soybean)उत्पादनात अग्रेसर, तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. जगात उत्पादीत होणाऱ्या ९० टक्के सोयाबीनचे गाळप होते. सोयापेंडला मोठी मागणी असते. तर सोयातेल मानवी आहारात(human diet) वापरले जाते. तसचं मोठा हिस्सा बोयडिझेलासाठीही जातो. मात्र दक्षिण अमेरिका खंडातील देशांत दुष्काळी स्थिती आहे. सोयातेल उत्पादनात आघाडीच्या अर्जेंटीनात (Argentina)यंदा उत्पादन घटलं. त्यामुळे मागील वर्षभरापासून सीबाॅटवर सोयाबीन आणि सोयातेल दर तेजीत आहेत.
जागतिक सूर्यफूल तेलाचा विचार करता युक्रेनमध्ये निम्मे उत्पादन होते. तर रशियाचा वाटा ३० टक्केये. युक्रेनच्या एकूण सूर्यफूल तेल निर्यातीपैकी तब्बल ३० टक्के भारताला होते. तर चीन १५ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र सध्या दोन्ही देशांतून निर्यात थांबली आहे. जागतिक खाद्यतेल बाजारात पामेतेल, सूर्यफूल, सोयाबीन आणि मोहरी तेलानंतर सूर्यफूल तेलाचा व्यापार होतो. खाद्यतेलात सूर्यफूल तेलाचा वाटा १५ टक्क्यांवर आहे. मात्र सध्या सूर्यफूल तेल उपलब्ध होत नाही. त्यामुळे खरेदीदार पर्यायी सोयाबीन आणि पामतेलाकडे वळाले.
हे हि पहा :
जगात सर्वाधिक वापरले जाणारे खाद्यतेल म्हणजेच पामतेल. इतर तेलांच्या तुलनेत कमी दर असल्याने पसंतीही अधिकये. मात्र मागील वर्षभरापासून पामतेलाचे दर वाढले. आता युध्दामुळे पामतेल पहिल्यांदाच एवढे महाग झाले. इंडोनेशियाने पामतेलाचा २० टक्के देशातच वापर बंधनकारक केला. त्यामुळे पामतेलाच्या दरात ४५ टक्क्यांनी वाढ झाली. पामतेलाने ५ हजार रिंगीट, नंतर ६ हजार आणि आता ७ हजार रिंगीटचा टप्पा गाठला. पामतेलाचे दर वाढल्याने खरेदीदार सोयातेलाकडे वळाले. परिणामी सोयातेलाचेही दर तेजीत आहेत.
सोयातेलामुळे सोयाबीनलाही अच्छे दिन आले. सध्या सोयाबीनचे दर मागीलवर्षीपेक्षा १९ टक्क्यांनी अधिकये. तर दोन वर्षांच्या तुलनेत ८६ टक्क्यांनी वाढले. सीबाॅटवर सोयातेलाच्या दरात मागीलवर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढ झाली. तर २०२० च्या तुलनेत दर अडीचपटीने वाढले. जगात खाद्यतेलाचा तुटवडा आहे. त्यातच युध्दामुळे दोन्ही देशांतील निर्यात थांबली. याचा फटका थेट मोठा ग्राहक असलेल्या भारताला बसत आहे. भारत जगातील एकूण निर्यातीपैकी १८ टक्के आयात करतो. पाम तेलाचे दर विक्रमी पातळीवर असल्याने आधीच भारतात आयात धीमी होती. आता सूर्यफूल तेलाचाही पुरवठा थांबल्यानं खाद्यतेल साठा कमी होतोय.
[ad_2]
Source link